Pashu vatap yojana : पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्या करिता राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या योजना मधील एक महत्वाची योजना म्हणजे नाविन्य पूर्ण योजना होय. या योजने अतर्गत शेतकर्यांसाठी गाई म्हशीच्या खरेदी वर 75% अनुदान मिळेल. चला टीआर जाणून घेऊ सविस्तर.
राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने राबविला जाणाऱ्या या अवयक्तिक लाभाच्या राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजना अंतर्गत प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी सन 2021 22 या आर्थिक वर्षापासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवणे व लाभार्थी निवड करण्याची पद्धत सुरू करण्यात आली आहे.
पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन विभागाअंतर्गत सुरू असलेल्या विविध प्रकाराच्या वैयक्तिक लाभाच्या नाविन्यपूर्ण योजना साठी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू आहे ऑनलाइन फॉर्म भरण्याची अंतिम तारीख ७ डिसेंबर २०२३ आहे.
जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत २०२३-२४ या वर्षासाठी वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी ऑनलाइन अर्ज भरणे सुरू आहे.याअंतर्गत ७५ टक्के अनुदानावर दुधाळ जनावरे दिली जातात.जिल्ह्यात या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी पुढे येत आहेत.
राज्यस्तरीय योजनेंतर्गत दुधाळ गायी व म्हशींचे वाटप करणे,शेळी-मेंढी गट वाटप करणे,१,००० मांसल कुक्कुट पक्ष्यांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणी अर्थसाहाय्य देणे,शंभर – कुक्कुट पिलांचे वाटप व २५ अधिक ३ – गट वाटप या योजनांसाठी ऑनलाइन पद्धतीने लाभार्थी प्रक्रिया २०२३-२४ पासून राबविण्यात येत आहे.
या महाराष्ट्र राज्य योजने मध्ये पशुपालकांना डेअरी,पोल्ट्री किंवा शेळी पालन यापैकी ज्यासाठी अर्ज करावयाचा आहे,त्याची निवड करण्याची सुविधा आहे.अर्ज केल्यानंतर त्यास दरवर्षी अर्ज करावे लागून नये,यासाठी तयार केलेली प्रतीक्षा यादी २०२५-२६ पर्यंत लागू ठेवण्याची सोय केली आहे.
काय आहे ही पशू वाटप योजना ?
जिल्हा परिषदेच्यापशुसंवर्धन विभागामार्फत ही योजना राबविली जाते.यात ७५ टक्के अनुदानावर गाई,म्हशी , शेळी यासारखी दुधाळ जनावरे दिली जातात. ७ डिसेंबर २०२३ पर्यंत अर्ज करता येईल.दरवर्षी अर्ज करण्याची गरज नाही.एकदा अर्ज केल्यानंतर लाभार्थ्यांना दरवर्षी अर्ज करण्याची गरज नाही. प्रतीक्षा यादीनुसार क्रम लागत राहतो.जिल्ह्यात या योजनेचा लाभ पाचशेहून अधिक लाभार्थ्यांनी घेतला आहे.
pashu vatap yojana पात्रता निकष :
पशुपालनाचा अनुभव असावा.
अल्प व अत्यल्प भूधारकांना प्राधान्य दिले जाते.
आधार कार्ड आवश्यक आहे७५ टक्के अनुदानावर दुधाळ जनावर मिळते.
सरकार ने केला मुफ्त शिलाई मशीन चा आदेश मंजूर..
पशू वाटप योजना लाभार्थी निवड प्रक्रिया कशी आहे ?
- सुरवातीला अर्जदाराला महाराष्ट्र पशुसंवर्धन विभागाच्या पोर्टलवर जाऊन नोंदणी करून घ्यावी लागेल.
- ही नोंदणी झाल्यानंतर पशू वाटप या योजनेसाठी अर्ज करावा लागेल.
- हे अर्ज स्वीकारल्यानंतर मिळालेला अर्जामधून प्राथमिक निवड केली जाईल.
- रेड मायझेशन पद्धतीने लाभार्थ्यांची प्राथमिक निवड केली जाईल.
- निवड झालेल्या अर्जदारांची कागदपत्रे अपलोड करण्यात येईल.
- यानंतर अंतिम निवड केली जाईल त्यानंतर विकास अधिकारी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी आणि पशुसंवर्धन उपायुक्त यांच्यामार्फत कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.
- त्यानंतर लाभार्थीमार्फत कागदपत्रातील त्रुटी पूर्तता करून घेतल्या जाईल.
- शेवटी कागदपत्राची अंतिम पडताळणी केली जाईल आणि या आधारे अंतिम लाभार्थी यादी तयार केली जाईल.
पशू वाटप योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे ?
- अर्जदारचे आधार कार्ड
- मोबाईल नंबर व ईमेल आयडी
- सातबारा व आठ उतारे उतारे उपलब्ध नसल्यास काढून दिले जातील.
- रेशन कार्ड सत्यप्रत
- रेशन कार्ड वरील सर्व सदस्यांचे आधार कार्ड नंबर
- राष्ट्रीयकृत बँक खाते पासबुक सत्य
- अर्जदार याचा फोटो व सही
- अनुसूचित जाती जमाती असल्या जातीच्या दाखल्याचा सत्यप्रत
- दारिद्र्यरेषेखालील असल्यास प्रमाणपत्र
- दिव्यांग असल्यास दाखला
शेतीमध्ये क्रांती घडवण्यासाठी या आधुनिक साधनांचा करा वापर !!