Bamboo Research and Training Center: शंभर टक्के शासकीय अनुदानातून मोफत तीस दिवसीय निवासी बांबू फर्निचर प्रशिक्षण

Bamboo Research and Training Center

बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र सोसायटी, चिचपल्ली, चंद्रपूर (Bamboo Research and Training Center Society, Chichappally, Chandrapur) अंतर्गत 100% शासकीय अनुदानातून “ 30 दिवसीय निवासी बांबू फर्निचर प्रशिक्षण” साठी बांबू फर्निचर क्षेत्रातील विविध कामगारांकडून व बांबू फर्निचरबाबत आवड असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

बांबू पासून तयार होणारे साहित्य

 बांबूपासून टेबल, खुर्च्या, कपाट, सोफा, पलंग अशा अनेक वस्तू बनवल्या जात आहेत.
त्यामुळे येथील आदिवासी मुलांना प्रशिक्षण घेऊन स्वयंरोजगार मिळत आहे.
जंगलामध्ये वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होत असून, अतिटिकाऊ लाकूड हद्दपार झालेले दिसत आहे. यामुळे भविष्यात लाकडापासून बनवलेल्या वस्तू दिसेनाशा होतील.
अशा परिस्थितीत बांबूची लागवड केली जात आहे.
सध्या बांबूचा जागतिक व्यापार जवळपास ६० हजार कोटी रुपयांचा असून, त्यात चीनचा वाटा ५० टक्के असून,
भारताचा हा व्यापार चार हजार ३०० कोटी रुपयांच्या घरात आहे.Bamboo Research and Training Center

लाडली बहना योजनेचा सातवा हप्ता जारी, प्रत्येक महिलेला मिळणार 3000 रुपये,
इथून चेक करा पेमेंट स्टेटस

बांबू फर्निचर बनवण्यापूर्वी विविध घटकांचा अभ्यास करून त्याचा सराव करण्यात येतो. बांबू फर्निचर प्रशिक्षणामध्ये बांबूपासून खिळे बनवणे, स्किन करणे, पेर काढणे, पट्टी बनवणे, रंग आणि ग्रुव जोडणी, बांबू सरळ करणे, वाकवणे, कीट तयार करणे इत्यादी बाबींचे प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षणार्थीना यामुळे उत्पादन बनवण्याचे सखोल ज्ञान होते. या टप्प्यामध्ये बांबूचे विविध घटक एकत्र करून मुख्य फर्निचर बनवले जाते. घटक जोडीमध्ये बांबूचे खिळे, फेविकॉल व एरोलाइट इत्यादीचा वापर केला जातो.

बांबू एक कल्पवृक्ष

माणसाच्या सामाजिक आर्थिक जीवनातील बांबूचे उपयोग लक्षात घेता, एक बांबू एक कल्पवृक्ष ही ओळख सार्थ वाटते. या बांबूपासून विविध वस्तू बनवल्या जात आहेत. या वस्तू टिकाऊ व मजबूत असल्याने पन्नास वर्षांहून अधिक टिकतील, असे व्यवस्थापक यांनी सांगितले.

ही योजना एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या माध्यमातून असून भारत सरकारच्या केंद्रीय अनुदाना अंतर्गत आहे. या योजनांचा लाभ जिल्ह्यात अनेक तरुण पिढीने घेतल्याने प्रत्येक बेरोजगाराला काम मिळू शकेल. ही योजना पाच ते सहा महिन्यांपासून चालू असून अनेक मुले याचा लाभ घेत आहेत.

पात्रता:-Bamboo Research and Training Center

  • १. अर्जदार दहावी उत्तीर्ण असावा,
  • २. बांबू फर्निचर क्षेत्राची आवड व अनुभव,
  • ३. अर्जदार महाराष्ट्रातील सहवासी असावा,
  • ४. वयोमर्यादा 18 ते 40 वर्ष दरम्यान असावी.

अर्ज स्वीकृतीचा अंतिम दिनांक

स्वीकृतीचा अंतिम दिनांक हा 31 डिसेंबर 2023 आहे या तारखेपर्यंत तुम्ही Bamboo Research and Training Centerतुमचा अर्ज नोंदवावा. 31 डिसेंबर 2023 ही तारीख निघून गेल्यास तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही ही दक्षता घ्यावी.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top