Trending

ठिबक सिंचन 80% अनुदान योजना 2022 | तुषार सिंचन योजना Thibak Sinchan Yojana

सन २०२१-२२ मध्ये मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेकरिता रु. २०० कोटी निधी वितरीत करणेबाबत. Thibak Sinchan Yojana

प्रस्तावना :

ठिबक सिंचन 80% अनुदान योजना 2022 : राज्यातील शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाची सोय उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने अवर्षणप्रवण क्षेत्र तसेच आत्महत्याग्रस्त व नक्षलग्रस्त जिल्ह्यात मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना राबविण्यास दि १९ ऑगस्ट २०१९ रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली होती . Thibak Sinchan Yojana

ही पण वाचा:

Mahila kisan yojana महिला किसान योजना असा मिळतो लाभ..

तद्नंतर सदर योजना सन २०२१-२२ पासून राज्यातील उर्वरित तालुक्यांमध्ये देखील राबविण्याचा निर्णय दि १८ नोव्हेंबर २०२१ रोजीच्या शासन निर्णयान्वये शासनाने घेतला आहे. प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेंतर्गत राज्यातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना ५५% आणि इतर शेतकऱ्यांना (५ हेक्टरच्या मर्यादित) ४५% अनुदान देण्यात येते. सदर अनुज्ञेय अनुदानाशिवाय “मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेंतर्गत अल्प व अत्यल्प भू धारक शेतकऱ्यांना २५ % आणि इतर शेतकऱ्यांना ३०% पूरक अनुदान देऊन सूक्ष्म सिंचनासाठी अनुक्रमे ८०% व ७५% एकूण अनुदान देण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे.

सन २०२१-२२ मध्ये प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेंतर्गत सूक्ष्म सिंचन संच बसविलेल्या शेतकऱ्यांना पूरक अनुदान देण्यासाठी मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेंतर्गत रु.२०० कोटी निधी आयुक्त (कृषि) यांना वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती, त्यास अनुसरुन शासन पुढीलप्रमाणे निर्णय घेत आहे. Thibak Sinchan Yojana

शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

सन २०२१-२२ या वर्षात मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेकरिता रु. २०० कोटी रुपये दोनशे कोटी फक्त) निधी आयुक्त (कृषि) यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरीत करण्यात येत आहे. सदर निधी खालील लेखाशिर्षाखाली सन २०२१-२२ च्या मंजूर तरतुदीतून खर्ची टाकावा. Thibak Sinchan Yojana

ही पण वाचा:

Goat Farming Yojana ही बँक शेळीपालन आणि शेड बांधण्यासाठी 10 लाखांचे कर्ज अनुदान देईल; सविस्तर वाचा

या योजनेंतर्गत लाभार्थी निवडीची तसेच अनुदान वितरणाची प्रक्रिया महा डीबीटी व PMFS प्रणालीव्दारे करण्यात यावी. या शासन निर्णयान्वये वितरीत केलेला निधी सन २०२१-२२ मध्ये सूक्ष्म सिंचन संच बसविलेल्या लाभार्थ्यांना पूरक अनुदान देण्याकरिता विनियोगात आणावा. Thibak Sinchan online application Maharashtra तुषार सिंचन योजना ऑनलाईन अर्ज कसा भरावा.

➡️ अधिक माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचा फिन मराठी व्हॉट्सॲप ग्रूप

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!