Trending

taran karj yojana शेतकऱ्यांना आता पैशांसाठी वणवण भटकण्याची गरज नाही शेतमाल तारण कर्ज योजनेतून शेतमालावर मिळणार 75% कर्ज

 भारत हा एक शेतीप्रधान देश आहे. देशाची अर्थव्यवस्था ही सर्वस्वी शेतीवर आधारित आहे. मात्र देशातील शेतकरी बांधवांना अनेकदा शेतमालाला मिळत असलेल्या कवडीमोल दरामुळे अतिशय नगण्य उत्पन्न मिळत असते. taran karj yojana

यामुळे शेतकरी बांधवांना मोठा आर्थिक भुर्दंड बसत असतो. मात्र जर शेतकरी बांधवांनी ज्यावेळी शेतमालाला कमी बाजारभाव मिळतो त्यावेळी शेतमालाची साठवणूक करून तेव्हा बाजारात तेजी असते तेव्हा शेतमाल विकल्यास त्यांना फायदा होऊ शकतो. मात्र अनेक शेतकरी बांधवांना धमाल साठवणे शक्य नसते कारण की त्यांना घरखर्चाला आवश्यक पैसा असतो.

अर्ज नमुना डाऊनलोड करण्यासाठी

येथे क्लिक करा

अशा परिस्थितीत शेतमालाची काढणी झाल्यानंतर शेतकरी बांधव ताबडतोब शेतमाल विक्री करण्यास प्राधान्य देतात. यामुळे शेतकरी बांधवांना हजारो रुपयांच नुकसान सहन करावं लागतं. यामुळे शेतकरी बांधवांच्या सोयीसाठी राज्यात एक विशेष योजना कार्यान्वित आहे. या शेतकरी हिताच्या योजनेतून शेतकरी बांधवांना शेतमालाला तारण ठेवता येते आणि कर्ज घेता येते.

मित्रांनो ही योजना 1990-91 साली महाराष्ट्र राज्य कृषि पणन महामंडळाकडून सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यात सुरू असलेल्या या शेतकरी हिताच्या योजनेला शेतमाल तारण योजना असे म्हणून देखील ओळखली जाते. या योजनेच्या माध्यमातून शेतमाल तारण ठेवून शेतकऱ्यांना सुलभ कर्ज बाजार समिती प्रशासनाकडून पुरवले जाते. taran karj yojana

महाराष्ट्र राज्य कृषि पणन महामंडळ ही योजना राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून राबवत आहे. अशा परिस्थितीत आज आपण महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळ यांच्याकडून राबवली जाणारी शेतमाल तारण कर्ज योजना नेमकी आहे तरी कशी? या योजनेचे स्वरूप नेमके कसे आहे? तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधवांना कुठे संपर्क करावा लागेल? या विषयी सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर. taran karj yojana

हे पण वाचा

Favarni Anudan Yojana शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी पाॅवर स्प्रेअर आणी नॅपसॅक फवारणी यंत्रांवर 50% अनुदान मिळणार

शेतमाल कृषी तारण कर्ज योजनेचे स्वरुप :-

शेतमाल कृषी तारण कर्ज योजने अंतर्गत शेतकरी बांधवांना बाजार समितीच्या गोदामात तारण ठेवलेल्या शेतमालाच्या एकूण किमतीच्या 75 टक्के एवढी रक्कम कर्ज म्हणून उपलब्ध करून दिली जाते. ही कर्जाची रक्कम एकूण सहा महिन्याचा कालावधी साठी शेतकऱ्यांना उपलब्ध होते. म्हणजेचं शेतकरी बांधवांना सहा महिन्यात या कर्जाची परतफेड करायची असते. शेतमाल तारण ठेवून दिल्या जाणाऱ्या कर्जावर 6 टक्के व्याज आकारले जाते. मात्र हे कर्ज शेतकरी बांधवांना त्वरित मिळत असल्याने याचा फायदा शेतकऱ्यांना होतो. taran karj yojana

या कर्जाच सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे शेतकरी बांधवांच्या शेतमालाला गोदाम भाडे, विमा, देखरेख खर्च इत्यादी बसत नसतो. हा सर्व खर्च बाजार समिती उचलत असते.

या महिन्याच्या आत कर्जाची परतफेड करणाऱ्या बाजार समितीला तीन टक्के व्याजाची सवलत दिली जाते

तसेच राज्यातील ज्या बाजार समित्यां स्वता निधी उभारून तारण कर्ज योजना राबवतात त्यांच्यासाठी देखील तीन टक्के व्याजाची सवलत अनुदान म्हणून दिली जाते.

योजनेचा लाभ घेण्यासाठी 

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, शेतमाल कृषी तारण कर्ज योजना या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधव आपल्या जवळच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत भेट देऊन या योजनेविषयी विचारपूस करू शकतात. तसेच कृषी पणन मंडळाची विभागीय कार्यालय येरवडा पुणे 6 येथे प्रत्यक्ष भेट देखील देऊ शकतात. किंवा dsopune6@gmail.com या संकेतस्थळाला भेट देऊन या योजनेची सविस्तर माहिती जाणून घेऊ शकतात. निश्चितचं महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळ यांनी सुरू केलेली ही 1990 सालाची योजना शेतकऱ्यांसाठी आजही लाभप्रद ठरणारी आहे. यामुळे शेतकरी बांधवांना आपला शेतमाल कमी किमतीत न विकता जेव्हा बाजारात चांगला बाजारभाव मिळेल तेव्हा विकता येणार आहे.

हे पण वाचा

 kamgar safety kit बांधकाम कामगारांना मिळत आहेत पेट्या त्यासोबत हे सर्व साहित्य असा करा अर्ज

शेतमालाचे प्रकारानुसार तारण कर्जाची मुदत व व्याजदर

अ.क्रशेतमाल प्रकारकर्ज वाटपाची मर्यादामुदतव्याज दर
१.सोयाबीन, तुर, मुग, उडिद, चना, भात (धान) करडई, सुर्यफूल, हळदप्रत्यक्ष बाजारभावानूसार एकूण किंमतीच्या 75% रक्कम.६ महिने६ टक्के
२.ज्वारी, बाजरी, मका व गहूएकुण किंमतीच्या 50% रक्कम. (रू. 500/- प्रती क्विंटल अथवा प्रत्यक्ष बाजार भाव यापैकी कमी असणारी रक्कम)६ महिने६ टक्के
३.काजू बीएकूण किंमतीच्या 75% रक्कम. (रु.50 प्रति किलो अथवा प्रत्यक्ष बाजार भावाची किंमत यापैकी कमी असेल ती रक्कम६ महिने६ टक्के
४.बेदाणाएकुण किंमतीच्या कमाल 50% किंवा जास्तीत जास्त रु. 50,000/- प्रति मे.टन यातील कमी असणारी रक्कम६ महिने६ टक्के

➡️ बिझनेस विषयी माहितीसाठी व मदतीसाठी जॉईन करा आपल्या जिल्ह्याचा फिन मराठी व्हॉट्सॲप ग्रुप

योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये, अटी व शर्ती 

  • शेतमाल तारण कर्ज योजनेअंतर्गत फक्त उत्पादक शेतकऱ्यांचाच शेतीमाल स्विकारला जातो. व्यापाऱ्यांचा शेतीमाल या योजनेअंतर्गत स्विकारला जात नाही.
  • प्रत्यक्षात तारण ठेवलेल्या शेतमालाची किमंत ही त्यादिवसाचे बाजारभाव किंवा शासनाने जाहीर केलेली खरेदी किंमत यापैकी जी कमी असेल ती ठरविण्यात येते
  • तारण कर्जाची मुदत 6 महिने (180 दिवस) असुन तारण कर्जास व्याजाचा दर 6% आहे.
  • बाजार समितीकडून कृषि पणन मंडळास 3% प्रमाणे कर्ज व्याजाची परतफेड. (उर्वरीत 3% व्याज बाजार समितीस प्रोत्साहनपर अनुदान). मुदतीत कर्ज परतफेड न केल्यास व्याज सवलात नाही.
  • महिने (180 दिवस) मुदतीनंतर सहा महिन्यापर्यत 8 टक्के व्याज दर व त्याचे पुढील सहा महिन्याकरिता 12 टक्के व्याज दर आकारणी केली जाते. 6. तारण ठेवलेल्या शेतमालाची साठवणुक, देखरेख व सुरक्षा बाजार समिती विनामुल्य करते.
  • तारणातील शेतमालाचा विमा उतरविण्याची जबाबदारी संबंधीत बाजार समितीची राहते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!