SocialTrending

आता माती परीक्षण करा फक्त 90 सेकंदामध्ये आपल्या मोबाईलवर soil testing

उत्पादन वाढीसाठी आणि शेत जमिनीचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी माती परीक्षण ही एक महत्वाची प्रक्रिया आहे. माती परीक्षणासाठी 1 किलो माती परीक्षणाच्या लॅबमध्ये घेऊन जाण्याचा आटापिटा आणि मग काही दिवसांनी त्याचा रिपोर्ट अशी संपूर्ण प्रक्रिया होती. पण कानपूर येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेने (आयआयटी) माती परीक्षण वेगाने व अचूक करण्यासाठी पोर्टेबल किट विकसित केले आहे. soil testing

ही पण वाचा:

👇👇👇

cotton खुशखबर कापसाला मिळणार चांगला भाव…

🔰वेळीची बचत अन् अचूक परीक्षण

काळाच्या ओघात सामान्य शेतकरीही माती परीक्षणावर भर देत आहे. माती परीक्षणासाठी साधारणपणे 1 किलो माती नमुना योगशाळेमध्ये नेऊन द्यावा लागतो. त्यात अपेक्षित घटकानुसार त्याचे निष्कर्ष मिळण्यासाठी दोन ते सात दिवस लागू शकतात. यामध्ये शेतकऱ्यांना वाहतुकीचा खर्च, वेळ आणि पैसा खर्च होतो. या त्रासामुळे बहुसंख्य शेतकरी माती परीक्षणापासून करण्यापासून वंचित राहतात. शेतकऱ्यांची ही समस्या दूर करण्यासाठी आयआयटी कानपूर येथील संस्थेच्या रसायन अभियांत्रिकी विभागातील जयंत कुमार सिंग, पल्लव प्रिन्स, अशर अहमद, यशस्वी खेमानी आणि महम्मद आमीर खान यांनी हे उपकरण बनवले आहे. soil testing

🔰असे होते परीक्षण

परीक्षणाचा निष्कर्ष त्वरित मोबाईलवर प्राप्त होण्यासाठी ‘भू परीक्षक’ हे मोबाईल ॲप तयार केले. (Google Play Store) या तंत्रज्ञानाचे हस्तांतर संस्थेने ॲग्रोएनएक्सटी सर्व्हिसेस या कंपनीला केले आहे. केवळ पाच ग्रॅम माती नमुना 5 सेंमी लांबीच्या परीक्षानळीसारख्या दिसणाऱ्या उपकरणामध्ये टाकायचा. त्यानंतर हे उपकरण ब्ल्यूटूथद्वारे मोबाईलशी जोडायचे. जर ब्ल्यूटूथ चालू असेल, तर ते आपोआप जोडले जाते. ही प्रक्रिया 90 सेकंदांमध्ये पार पडते. त्यानंतर मोबाईलच्या स्क्रीनवर भू-परीक्षक या विशेष तयार केलेल्या ॲपमध्ये मातीच्या आरोग्याचा अहवाल एकमेव अशा आयडी क्रमांकासह त्वरित उपलब्ध होतो.

🔰मातीचा नमुना घेण्याची पद्धत काय आहे

मातीचा नमुना घेण्यासाठी आपण सर्वप्रथम शेतामध्ये जावे. शेता मध्ये गेल्यानंतर आपल्याला शेताची योग्यरीत्या पाहणी करावी. यानंतर आपण मातीची योग्यरीत्या पाहणी केल्यानंतर पृष्ठभागावर असणारा मातीचा रंग हा वेगळा असतो तसेच पृष्ठभागावरील माती ही वेगळ्या प्रकारचे असते. त्याचप्रमाणे चढ-उतार असणाऱ्या जमिनीवरील पृष्ठभागावरील माती ही वेगळ्या प्रकारचे असते.

तसेच सपाट असणाऱ्या जमिनीवरील माती ही वेगळ्या प्रकारचे असते. म्हणूनच आपण माती परीक्षण घेताना योग्य रीतीने माती घ्यावी. soil testing

 1. एक सारखे जमिनीमधून आपण माती घेत असल्यास आपण त्या माती मध्ये येणारा कचरा ज्याप्रमाणे तसेच गवत यांसारखा कचरा आपण सर्वप्रथम माती मधून काढून टाकावा.
 2. ज्या ठिकाणी पिकांची लाईन मध्ये पेरणी केली असेल त्या ठिकाणी दोन लाईन मधील आपण मातीचा नमुना घ्यावा.
 3. ज्या ठिकाणी नुकतीच खते टाकलेली असेल तसेच ज्या ठिकाणी पाणथळ जमीन असेल त्याच प्रमाणे खोलगट जमीन असेल अशा ठिकाणच्या आपण माती परीक्षणासाठी मातीचा नमुना घेऊ नये.
 4. सपाट जमिनीवर आपण मातीमध्ये 30 बाय 30 चा खड्डा खणावा. त्यामध्ये आपण त्यामधून माती उचलावी ती माती आपण माती परीक्षणासाठी घ्यावी.
 5. आपण घेतलेली माती स्वच्छ माती एका प्लास्टिकच्या कागदामध्ये टाका व त्याचे चार समान भाग करावेत माती ओली असेल तर ती सुकवा. चार भाग केलेल्या भागांमधील दोन भाग घ्यावे व ते दोन भाग एकमेकांमध्ये मिसळावेत.

  एक किलो ग्रॅम होईपर्यंत ते एकमेकांमध्ये मिसळावे आणि हे एक किलो ग्रॅम चे मातीचे प्लास्टिकचे पॅकेट आपण माती परीक्षणासाठी पाठवू शकतो.

ही पण वाचा:

👇👇👇

शेतकऱ्यांन साठी धक्कादायक बातमी या जिल्ह्यात आढळली अतिविषारी घोणस आळी… Ghonas Aali

🔰माती परीक्षणाचे महत्व काय आहे

 • आपण आपल्या जमिनीतील माती परिक्षण केल्यामुळे आपल्याला आपल्या जमिनी मध्ये कोणते दोष आहेत हे तसेच कोणते घटक आहेत हे देखील लवकरात लवकर समजते.
 • माती परीक्षण केल्यानंतर आपल्याला जमिनीतील येणाऱ्या पिकाचे नियोजन करता येते तसेच कोणते पीक जमिनीमध्ये घ्यावी हे देखील शेतकऱ्याला समजत असते.
 • जमीन सुधारण्यासाठी माती परीक्षण हे महत्वाचे असते माती परीक्षण केल्यानंतर आपल्याला त्या पिकांमध्ये आपल्याला कोणती खते वापरावी. तसेच सेंद्रिय खते कोणती वापरावी हे देखील समजत असते.
 • माती परीक्षण केल्यानंतर आपल्याला आपल्या जमिनी मध्ये कोणत्या घटकांची कमी आहे हे जाणून घेण्याचा लवकरात लवकर मदत होते.
 • माती परीक्षण केल्यामुळे जमिनीची सुपीकता हे आपल्याला समजत असते. त्या बरोबरच आपल्याला जमिनीमधील उत्पादन क्षमता देखील वाढवण्यास मदत होत असते.

➡️ अधिक माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचा फिन मराठी व्हॉट्सॲप ग्रूप

🔰या बाबींचा होतो निष्कर्ष

या उपकरणामुळे मातीतील नत्र, स्फुरद, पालाश, सेंद्रिय कर्ब यांसह सहा घटकांचे प्रमाण समजू शकते. पिकाचा उल्लेख केलेला असल्यास त्या पिकासाठी शिफारशीत खतमात्रा आणि परीक्षणानुसार करायचे बदल यानुसार आपल्या शेतासाठीच्या खत शिफारशी सुचविल्या जातात. त्यानुसार पिकांचे खत व्यवस्थापन केल्यास पिकाचे उत्पादन वाढीसाठी फायदा होऊ शकतो. अद्यापही हे अॅप बाजारात आले नसले तरी यशस्वी झाले असून लवकरच सर्वसामान्य शेतकऱ्यांना वापरता येणार आहे.

हे देखील वाचा:

👇👇👇

स्वस्त सोने खरेदी करण्याची संधी, आरबीआयने सार्वभौम गोल्ड बाँड योजनेची दुसरी मालिका जाहीर केली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!