FarmingSocialTrending

Cotton Rate शेतकऱ्यांनो खुशखबर कापसाला यंदाच्या वर्षी मिळणार इतका दर !

Cotton Rate कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. यंदा बाजारात कापूस तेजीत राहणार आहे. असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. यंदा अतिवृष्टीमुळे राज्यात, देशात तसेच परदेशात देखील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. यामुळे यंदा कापूस उत्पादनात घट होण्याची दाट शक्यता आहे. यंदा कापूस लागवडीखालील क्षेत्रात वाढ झाली आहे. पण जगभरात पावसामुळे उत्पादनात घट होण्याची चिंता सरसावत आहे. याच पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात यंदा कापसाला किती भाव मिळू शकतो. Cotton Rate

कापसाला किती मिळेल दर पाहण्या साठी

येथे क्लिक करा

शेतकऱ्यांना यंदा कापसासाठी किती दर मिळेल?

जागतिक पातळीवर मागील काही महिन्यांपासून कापड बाजार आणि उद्योग अडचणीत होते. महागाई त्याचं मूळ कारण होतं. मात्र आता भारतासह काही देशांमध्ये परिस्थिती सुधारतेय. भारत आणि इतर महत्वाच्या बाजारपेठांमध्ये कपड्यांना सणांसाठी मागणी वाढतेय. पुढील महिनाभरात जागतिक कापड बाजार सुधारण्यास प्रारंभ होऊ शकतो. याचा फायदा भारतीय कापसाला होणार आहे. कारण नेमकं याच काळात देशातील बाजारात कापसाची आवक वाढेल. Cotton Rate

हे पण वाचा

LPG Cylinder Price खुशखबर! सिलिंडरच्या दरात मोठी घसरण, आता फक्त एवढ्याच रुपयात घरी येणार

यंदा अमेरिका आणि पाकिस्तानमध्ये कापूस उत्पादन घटलं. चीनमध्येही अतिउष्णतेमुळं उत्पादन कमी झालं. त्यामुळं जागतिक बाजारात कापूस पुरवठा कमी होऊन भारतीय कापसाला मागणी वाढू शकते. यंदा देशात कापूस उत्पादन वाढेल, असं उद्योग सांगत असले तरी त्याची शक्यता खूपच कमी आहे. तसचं उद्योग सांगतो त्याप्रमाणं देशातील कापूस उत्पादन ३६० किंवा ३७५ लाख गाठी होणार नाही.

देशातील उत्पादन यंदा जास्तीत जास्त ३३० लाख गाठींपर्यंत पोचेल, असं जाणकारांनी सांगितलं. सध्या आवक होणाऱ्या कापसामध्ये ओलावा अधिक असल्यानं किमान दर ७ हजार ५०० रुपयांपर्यंत नरमले. मात्र ओलावा कमी झाल्यानंतर शेतकऱ्यांना यंदा सरासरी ८ हजार ५०० ते ९ हजार रुपये प्रतिक्विंटचा दर मिळेल, असा अंदाज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ही दरपातळी लक्षात ठेऊन आणि बाजाराचा आढावा घेऊन टप्प्याटप्प्याने कापसाची विक्री करावी, असं आवाहन जाणकारांनी केलंय. Cotton Rate

गाजराच्या दरात सुधारणा

बाजारात सध्या गाजराला चांगला दर मिळतोय. नवरात्रीमुळं गाजराला बाजारात मागणी आहे. त्यामुळं गाजराचे दरही तेजीत आले आहेत. आवकेचा विचार करता पुणे, मुंबई आणि नागपूर बाजार समित्यांमध्ये सरासरी १०० क्विंटलपेक्षा जास्त आवक होतेय.

मात्र इतर बाजार समित्यांमधील आवक ही सरासरी २० क्विंटलपेक्षा कमीच आहे. त्यामुळं गारजराला प्रतिक्विंटल ३ हजार ते ५ हजार रुपये दर मिळतोय. पुढील काही दिवस बाजारातील गाजर आवक वाढण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे गाजराचे दर टिकून राहतील, असा अंदाज आहे. Cotton Rate

हरभरा दर दबावातच

बाजारात हरभऱ्याचे दर दबावातच आहेत. देशात यंदा हरभऱ्याचं उत्पादन विक्रमी झालं. त्यातच नाफेडने खरेदी केलेला हरभरा आता बाजारात येत आहे. नाफेडने मागील काही महिन्यांपासून हरभऱ्याची खुल्या बाजारात विक्री वाढवली. त्यामुळं बाजारात पुरवठा वाढून दर दबावात आलेले आहेत.

हे पण वाचा

taran karj yojana शेतकऱ्यांना आता पैशांसाठी वणवण भटकण्याची गरज नाही शेतमाल तारण कर्ज योजनेतून शेतमालावर मिळणार 75% कर्ज

सध्या हरभऱ्याला प्रतिक्विंटल ४ हजार ३०० ते ४ हजार ८०० रुपये दर मिळतोय. एरव्ही दिवाळीच्या काळात हरभरा दर सुधारत असतात. मात्र यंदा हरभरा दरात फार मोठ्या तेजीची शक्यता नाही, असं जाणकारांनी सांगतलं. 

कारल्याला उठाव वाढला

राज्यातील बाजारात सध्या कारल्याची आवक खूपच कमी होत आहे. बाजारात कारल्याची (Bitter Gourd) मागणी मात्र टिकून आहे. त्यामुळं कारल्याला उठाव मिळतोय. परिणामी कारल्याचे दर तेजीत आहेत.

राज्यातील मोठ्या बाजार समित्या सोडता आवक सरासरी १० क्विंटलपेक्षाही कमीच आहे. त्यामुळं कारल्याला सध्या प्रतिक्विंटल २ हजार ५०० रुपये ते ४ हजार रुपये दर मिळतोय. कारल्याचे हे दर टिकून राहतील, असा अंदाज भाजीपाला बाजारातील जाणकारांनी व्यक्त केलाय. Cotton Rate

➡️ बिझनेस विषयी माहितीसाठी व मदतीसाठी जॉईन करा आपल्या जिल्ह्याचा फिन मराठी व्हॉट्सॲप ग्रुप

तुरीच्या दरातील तेजी कायम

देशात मागील काही महिन्यांपासून तुरीची टंचाई (Tur Shortage) जाणवत आहे. राज्यातील लातूर, कारंजा आणि अकोला या बाजार समित्यांमध्ये (Market Committee) काहीशी जास्त आवक होतेय. मात्र इतर  बाजारांमधील आवक ही नगण्य आहे. त्यातच सणांमुळं तुरीला मागणी (Tur Demand) मात्र जास्त आहे. त्यामुळं तुरीचे दर मागील काही महिन्यांपासून सरासरी ७ हजार ते ८ हजार रुपयांच्या दरम्यान आहेत. तुरीचा हा दर नवीन माल बाजार येईपर्यंत कायम राहील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!