BusinessMutual FundShare MarketTaxTrending

आता घडतील अजून चांगले अधिकारी ….

महाराष्ट्र सरकार अल्प मतात येतेय की काय अशी अवस्था सरकार समोर असताना आयोग आपला सुसाट वेगाने धावत आहे..गेल्या काही दिवसात आयोग खूप वेगाने हालचाल करताना दिसला. अधिकारी होण्यासाठी ज्या प्रमाणे अगोदर परीक्षा आयोग घेत होते,त्यामध्ये खूप बदल करण्यात आला.पहिली परीक्षा बहुपर्यायी होती .त्यामध्ये बदल करून मुख्य परीक्षा स्वरुप पुर्णपणे वर्णनात्मक केले आहे..म्हणजे ९ पेपर मध्ये आपल्याला लिखान करायचे आहे..

  ज्यांना लिहायला जमत नाही,आपले विचार व्यक्त करू शकत नाहीत त्यांनी आता एकतर लिहिण्याचा सरावकरणे गरजेचे आहे नाहीतर लिहिणे जमत नसेल तर आता तूम्ही एमपीएससी चा नाद न करता सरळसेवा ची तयारी केली पाहिजे .

आता अधिकारी होणे सोपे राहिले नाही.ज्यांचा सखोल अभ्यास आहे त्यांनीच फक्त या परीक्षेची तयारी करावी.युपीएससी च्या समान परीक्षेचे स्वरूप झालेले आहे.प्रत्येक विषय आता समजून उमजून घ्यावाच लागेल.प्रत्येक घडामोडीवर भाष्य् करता आलेच पाहिजे ,लिहिता आलेच पाहिजे.

दुसरी गोष्ट् आता परीक्षा पारदर्शक होण्यास आणखी मदत होईल.कारण ९ पेपर दयायचे आहेत ,तपासणी पध्दत् जर बघतली तर यामध्ये पैसे भरून नौकरी लागणे आता जवळपास अशक्य होउन बसले आहे..या निर्णयामुळे चांगले अधिकारी घडणार यात काय शंका नाही.आणि महाराष्ट्रातील विदयार्थ्यांसाठी आनंदाची बाब आहे .

तिसरी गोष्ट म्हणजे आता सर्व शाखेतील ‍ विद्यार्थी आता सतान पातळीवर आले आहेत.यात आता एकाला फायदा ,एकाला तोटा असले मुद्दे उपस्थित राहणार नाहीत.कारण वैकल्पिक विषयाचे दोन पेपर निवडायचे आहेत..ते आप आपल्या शाखेनुसार तूम्ही निवडू शकता..

राहीला प्रश्न् इंग्रजीचा तर त्याची तयारी तर तुम्हाला करावीच लागेल..विज्ञान शाखेमधील विद्यार्थ्यांना इंग्रजी येतेच अस नाही..त्यामुळे या विषयाची तयारी सर्व शाखेतील विद्यार्थ्यांना करावीच लागेल.ऱ्‍

 मूख्य् परीक्षेचे स्वरूप

१ परीक्षा –  वर्णनात्म्क

२ एकूण पेपर ९

३ अर्हताकारी पेपर –  यांचा मेरीट लिस्ट् मध्ये विचार केला जाणार नाही.

भाषा पेपर १ मराठी  ३०० गुण

भाषा पेपर २ इंग्रजी ३०० गुण

यामध्ये दोन्ही पेपर मध्ये २५ टक्के गुण पडले तर बाकीचे पेपर तपासले जातील.

गुणवत्ता यादीकरीता विचारात घ्यावयाचे पेपर व त्यांचेगूण

१ निबंध २५०गुण

२ सामान्य् अध्ययन १ २५० गुण

३ सामान्य् अध्ययन २ २५० गुण

४ सामान्य् अघ्ययन ३ २५० गुण

५ सामान्य् अघ्ययन ४ २५० गुण

६ वैकल्पिक विषय पेपर क्रमांक १  २५० गुण

७  वैक ल्पिक विषय पेपर क्रमांक २ २५० गुण

 ८ मुलाखत २७५ गुण

एकूण गुण २०२५ गुण

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!