Trending

आजपासून आपण इंग्रजी शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत

तूम्हाला इंग्रजी या विषयाबद्दल असलेली भिती घालवण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. मी उद्योजक या वेबसाइट वर फ्री मध्ये तूम्हाला इंग्रजी या विषयाचे संपूर्ण ज्ञान आम्ही उपलब्ध करून देत आहोत..चला तर मुलभूत गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करू या.

 कर्ता +‍ क्रियापद + कर्म   वाक्य बनवण्यासाठी तुम्हाल या तीन शब्दांची ओळख असणे गरजेचे आहे. कर्ता म्हणजे काय :  आपण जे वाक्य बोलणार आहोत त्या वाक्यामधील क्रिया करणारा शब्द तसेच काही वाक्यामध्ये कर्ता हा ज्याच्या विषयी आपण माहिती सांगतो तो असतो.

क्रियापद : आपण जे वाक्य बोलणार आहोत त्या वाक्यामधील क्रिया दर्शवणारा शब्द तसेच स्थिती दर्शवण्यासाठी मदत करणार शब्द म्हणजे क्रियापद.

कर्म : आपण  जे वाक्य बोलणार आहोत त्या वाक्यातील क्रिया ज्या शब्दावर घडते त्या शब्दाला कर्म म्हणतात.

एक वाक्य घेउया , मी चॉकलेट खातो . हे वाक्य आपल्याला इंग्रजी मध्ये लिहियाचे आहे

वाक्याची सूरूवात कर्त्याने करावी,त्यांच्या नंतर क्रियापद घ्यावे ,त्यांच्या नंतर कर्म घ्यावे. जे वाक्य आपण घेतले आहे त्याचा काळ आपल्याला माहित असणे गरजेचे आहे.शेवटी जर ता,ती ,ते जर आले तर समजायचे ते वाक्य साघ्या वर्तमान काळाचे आहे ,मग साघ्या वर्तमानाकाळाचे सुत्र आपल्याला माहित पाहिजे , कर्ता पहिल्यांदा घ्यावा,त्यांच्या नंतर क्रियापदाचे पहिले रूप घ्यावे,आणि त्यांच्यानंतर कर्म घ्यावे. मग दिलेल्या वाक्यात कर्ता शोधा.क्रिया करणारा कोण : तर त्याचे उत्तर येते मी ,म्हणून सूरूवातील मी घ्यावे.त्यांच्या नंतर क्रियापद शोधा  , क्रिया दर्शविणारा शब्द,म्हणजे खातो. मी च्या नंतर आपल्याला खातो घ्यावे लागेल,त्यांच्यानंतर कर्म शोधा.कर्म म्हणजे ज्याच्या वर क्रिया घडते असा  शब्द.म्हणजे चॉकलेट.

 मी चॉकलेट खातो हे इंग्रजी मध्ये कसे होईल  I eat  a chocolate.

मी पाणी पितो : I drink water.

मी चहा घेतो: I take tea.

मी नाष्टा करतो :  I do breakfast.

मी लवकर उठतो I get up early.

मी शाळेला जातो I go to school.

मीव्यायाम करतो. I do excercise.

मी लेख वाचतो.I read an article.

  या वरून तुम्हाला काय समजले की दैनंदिन जीवनात तुम्ही ज्या क्रिया करतात,तसेच नेहमी घडणाऱ्या क्रिया तसेच तुमच्या सवयी सांगण्यासाठी आपल्याला साध्या वर्तमान काळाचा वापर कराव लागतो. साध्या वर्तमानकाळाचे सूत्र आहे

Subject + first form of verb + object.

या सुत्राचा वापर करून आपल्याला आपल्या सवयी इंग्रजी मध्ये सांगता येतात.

यामधील दुसरा भाग असा की जर आपल्याला सवयी सांगायच्या आहेत पण त्या दुस-या व्यक्तीच्या तर ते कसे सांगणार.त्या साठी हेच सुत्र पण या मध्ये फक्त थोडासा बदल आपल्याला करावा लागेल.त्या अगोदर आपल्याला

प्रथम व्यक्ती ,द्वतीय व्यक्ती ,तृतीय व्यक्ती ची माहिती असणे गरजेचे आहे..

प्रथम व्यक्ती म्हणजे जो बालेणारा असतो त्याला आपण प्रथम व्यक्ती म्हणतो.

द्वतीय व्यक्ती म्हणजे जो ऐकणारा असतो त्याला आपण तृतीय व्यक्ती म्हणतो

तृतीय व्यक्ती म्हणजे ज्याच्या ‍ विषयी आपण बोलत असतो त्याला तृतीय व्यक्ती म्हणतात.

नियम असा आहे की जर आपला कर्ता तृतीय पूरूषी आणि एकवचनी असेल तर क्रियापदाला प्रत्यय लावायचे असतात.s,es हे प्रत्यय लावायचे असतात.

उदा. तो आंबा खातो

He eats a mango.

ती छान दिसते

She looks nice.

राम अभ्यास करतो

Ram  does study.

नितीन वेबसाईट बनवतो.

Nitin  makes websites.

Third persons : he ,she,ram,nitin

ज्याच्या विषयी आपण बोलत असतो त्याला तृतीयपुरुषी म्हणतात. आणि जर ते एकवचनी असतील तर क्रियापदाला प्रत्यय लावावे.

आता प्रश्न असा की कधी एस लावायचा आणि कधी ईएस लावायचा.

क्रियापदाच्या शेवटी जर x,sh,ch,z,o  असेल तर es लावावे.

क्रियापदाच्या शेवटी जर वाय असेल आणि वाय च्या अगोदर जर स्वर नसेल तर वाय काढून त्याच्या जागी ies घ्यावे.

जर शेवटी वाय असेल आणि आणि वाय च्या अगोदर जर व्यंजन नसेल म्हणजे जर स्वर असेल तर  s प्रत्यय क्रियापदाला लावावा.

तो रडतो

He cries.

ती खेळते

She plays.                           लेखक : राम ढेकणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!