कलावंतीण दुर्ग ह्या किल्ल्याविषयी माहीती

Information about Kalawantin Durg fort

कलावंतीण हा दुर्ग महाराष्ट्र राज्यातील एक सर्वात खतरनाक किल्ला म्हणून ओळखला जातो.

कलावंतीण दुर्ग हा फक्त महाराष्ट्र राज्यातील नव्हे तर संपूर्ण देशभरात असलेल्या खतरनाक किल्ल्यांपैकी एक मानला जातो.

प्रबळगड,कलावंतीण दुर्ग हे दोन्ही दुर्ग जोडी रायगड जिल्ह्यातील पनवेल पासुन सतरा किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.

कलावंतीण दुर्ग पुण्यापासून सुमारे १२० किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.अणि मुंबई शहरापासून फक्त ५० ते ८० किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.

कलावंतीण दुर्गाच्या पायरया सुमारे ८० अंशाच्या कोन्यात आहे.

कलावंतीण दुर्ग हे रायगड जिल्ह्यातील २ हजार २५० फुट इतके उंच शिखर आहे.यालाच कलावंतीण सुळका असे देखील म्हणतात.

हया किल्ल्यावर जाणे हा पर्यटक गिर्यारोहक तसेच इतिहास प्रेमींसाठी एक सुंदर अणि थरारक अनुभव ठरतो.

कलावंतीण दुर्ग ह्या किल्ल्याच्या पायथ्याशी ठाकुरवाडी नावाचे एक गाव आहे.पनवेलहुन बसने किंवा जीपने आल्यावर ठाकुरवाडी गावापासून आपणास ट्रॅकिंग करायला सुरुवात करता येते.

हया किल्ल्याच्या पायथ्याशी पर्यटकांना आपले वाहन पार्क करण्यासाठी तसेच नाश्ता वगैरे करण्याची देखील सोय करण्यात आली आहे.

इथे दुचाकी वाहन पार्क करण्यासाठी ३० रूपये अणि चारचाकी वाहन पार्क करण्यासाठी ५० रूपये इतके चार्जेस घेतले जातात.

कलावंतीण प्रबळ गड असे दगडावर नाव लिहिले तिथपर्यंत आपणास वाहन आणता येते मग तिथे गाडी पार्क करून तिथुन पुढे आपणास पायी प्रवास करावा लागेल.

कलावंतीण दुर्ग किल्ल्यावर असलेली पाहण्यासारखी ठिकाणे –

कलावंतीण दुर्गाच्या पायथ्यापासून कलावंतीण दुर्गाच्या सुळक्यापर्यत पोहचायला साधारणत दीड ते दोन तास इतका कालावधी लागतो.

किल्ल्याच्या पायथ्यापासून झाडाझुडुपांच्या मार्गाने किल्ल्यावर चढायला सुरुवात करावी लागते.सहयाद्रीच्या जंगलात असलेल्या कच्च्या रस्त्याने कलावंतीण दुर्गाकडे जायचे आहे.

गडाच्या माचीवर जात असताना आपल्याला भरपुर प्रमाणात छोट छोटे हाॅटेल दिसुन येतील.शनिवार रविवार तसेच पावसाळ्यात ह्या हाॅटेल्स मध्ये आपल्याला चहा पाणी नाश्ता,जेवण ह्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात.

गडावर जात असताना आपणास खुर्ची बांधुन ठेवलेला झोका पाहावयास मिळतो ह्या झोकावर पर्यटक आपल्या सोबत असलेल्या लहान मुलांना झोका खेळण्याचा आनंद देऊ शकतात.

ह्या खुर्ची बांधुन तयार केलेल्या झोक्यावर झुलायला २० ते ५० रूपये इतके चार्जेस घेतले जातात.

साधारणत एक ते दीड तास चालल्यावर ज्या पायरी मार्गाने आपण गडावर जातो आहे त्या पायरी मार्गाच्या बाजुला आपल्याला एक छोटेसे मंदिर दिसुन येते.हया मंदिरापाशी आपण येऊन पोहचतो.

ह्या मंदिरात आपल्याला महाबली पवनपुत्र हनुमान यांची दगडावर कोरण्यात आलेली मुर्ती पाहावयास मिळते त्याच्याच बाजूला श्रीगणेशाची देखील एक मुर्ती आहे.

अणि आपण ज्या मार्गाने गडावर जातो त्या मार्गावर आपणास जुन्या शिवकालीन पायरया देखील दिसुन येतील.

गडावर चढत असताना पर्यटकांना दम लागल्यावर विश्रांती करता यावी यासाठी जागोजागी बाक टाकुन बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

कलावंतीण दुर्गाच्या सुळक्याच्या पायथ्याशी एक गाव आहे त्याला प्रबळ माची असे म्हटले जाते.

प्रबळगडाच्या माचीवर येथे ३० ते ४० घरांची वस्ती आहे ह्या वस्ती वरूनच ह्या गावाला प्रबळ माची असे नाव देण्यात आले असावे.

साधारणतः २४०० फुट उंच अशा आकाशात गेलेला हा उत्तुंग सुळका महाराष्ट्रात हरिहर गडाप्रमाणे आपल्या विशिष्ट अशा आकारामुळे अणि इथे असलेल्या सुंदर पायरींमुळे प्रसिद्ध आहे.

कलावंतीण दुर्गाच्या सुळक्याकडे जात असताना आपणास दगडामध्ये कोरण्यात आलेली एक गुहा पाहावयास मिळते.

ह्या ह्या गुहेत खोली देखील असल्याचे सांगितले जाते.

गुहेच्या बाहेरील बाजूस पवनपुत्र हनुमान यांची एक छोटीशी मुर्ती देखील आपणास पाहावयास मिळते.

गुहेच्या आत गेल्यावर आपल्याला सर्वत्र अंधार दिसुन येईल.गुहेच्या डाव्या बाजूला एक अंधारमय अशी खोली देखील आहे.

ह्या खोलीत सर्वत्र अंधार असल्याने इथे मोबाईल टाॅर्च वगैरे न घेऊन जाता जाणे धोकादायक ठरू शकते.कारण अशा दाट गुहेत वाघ सिंह बिबट्या असे हिंस्त्र जंगली प्राणी असण्याची शक्यता असते.

गुहेतुन बाहेर निघाल्यावर आपणास सुळक्याच्या दिशेने जायचे आहे.गुहेतुन बाहेर निघाल्यावर पुन्हा पायरींने चालत गेल्यावर आपण प्रबळगड माचीवर येऊन पोहचतो.इथे आपणास सर्वत्र सपाट भुभाग पाहावयास मिळतो.

जागोजागी स्वच्छता ठेवण्यात आली असल्याचे दिसून येते.कलावंतीण दुर्गाच्या पायरीपर्यत जायला प्रबळगड माचीपासुन जवळपास अर्धा तास इतका कालावधी लागतो.

पुर्वीच्या काळी एक राजा होता ज्याचे कलावंतीण नावाच्या एका राणीवर खुप प्रेम होते ही कलावंतीण राणी त्याला सोडुन जाऊ नये म्हणून ह्या राजाने राणीला प्रबळ गडाच्या बाजुला असलेल्या सुळक्यावर एक महल बांधून दिला होता.

सध्या ह्या गडावरील सुळक्यावर हा महल अस्तित्वात नसल्याचे दिसून येते.पण सुळक्यावर चढण्यासाठी दगड फोडुन तयार करण्यात आलेल्या काळजाचा थरकाप उडवणारया ह्या कोरीव पायरी आजही आहेत.

कलावंतीण सुळक्याच्या पायथ्याशी वर जाण्यासाठी आधार म्हणून जागोजागी दोरखंड बसविण्यात आले आहेत.ज्यामुळे गडावर चढत असताना कोणीही पाय पसरून पडत नाही.

ह्या दोरीला पकडून आपल्याला खडकावरून गडावर जायचे आहे.

इथून थोडयाच अंतरावर कलावंतीण सुळक्याच्या पायरी देखील आहेत.हया पायरींवर चालत आपणास सुळक्यावर जायचे आहे.

सुळक्यावर जाण्यासाठी ज्या पायरया आहेत त्या पुर्णतः वरच्या बाजूला आहेत त्यामुळे ह्या गडाच्या पायरींवर चढताना खुप दम लागतो.

ह्या किल्लयाविषयी असे देखील सांगितले जाते की ह्या किल्ल्याचे आधीचे नाव दुसरेच होते अणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी हा किल्ला जिंकल्यानंतर त्यांनी ह्या किल्ल्याचे नाव कलावंतीण दुर्ग असे ठेवले होते.

पुढे कलावंतीण दुर्गाच्या सर्वात वरच्या टोकावर जाण्यासाठी दगडावर बांधलेल्या दोरीला पकडून रॅपलिंग करत आपणास वर जायचे आहे.

दोरीच्या साहाय्याने कलावंतीण दुर्गाच्या टोकावर जाण्यासाठी येथील स्थानिक लोकांकडून मदत देखील केली जाते.

पण दोरीला पकडून रॅपलिंग करत वर जाताना अतिशय सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे कारण मागील वर्षी कित्येक पर्यटकांना किल्ल्याच्या टोकावर रॅपलिंग करत वर जात असताना तोल सुटुन खाली पडल्याने मृत्युमुखी जावे लागले आहे.

कलावंतीण दुर्ग किल्ल्याच्या अखेरच्या टोकावर पोहचल्यावर आपणास येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक पाहावयास मिळते.

कलावंतीण दुर्गाच्या अखेरच्या टोकावर हे स्मारक २०२१ मध्ये बसविण्यात आले होते.

कलावंतीण सुळकयाच्या मधोमध एका बाजूला आपणास पाण्याचे टाके देखील दिसुन येते.एवढया उंचावर असलेल्या पाण्याच्या टाक्यात उन्हाळ्यात देखील आपणास भरपुर पाणी असल्याचे दिसून येते.

किल्ल्याचे वैशिष्ट्य –

नव्वद अंशामध्ये उभ्या असलेल्या कातळ दगडाला खोदुन तयार करण्यात आलेल्या पायरया अणि पायरयांमुळे तयार झालेले गडाचे थरारक रूप हे ह्या कलावंतीण दुर्ग किल्ल्याचे मुख्य वैशिष्ट्य मानले जाते.

एका बाजुला कातळ भिंत अणि दुसरया बाजुला दोन हजार फुट इतकी भयानक अशी खोल दरी इथे आपणास पाहावयास मिळते.

ह्याच थरारक रूपाचा अनुभव प्राप्त करण्यासाठी अनेक ट्रॅकर्स ह्या कलावंतीण दुर्गाला भेट देण्यासाठी येत असतात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top