SocialTrending

सहवास खूप जणांचा पण साथ फक्त काही जणांची..

लहानपणापासून ते जेवढे तूमचे वय आहे त्या क्षणापर्यंत तूमच्या आयुष्यात खूप जणांच्या सहवासात राहिले असणार..खूप जण तूमच्या आयुष्यात काही काळासाठी आले असतील आणि गेले पण असतील,खूप जण तूमच्या आयुष्याशी जोडलेले पण असतील , अशा जोडल्या गेलेल्या माणसांविषयी आपल्या मनात नेहमीच आपुलकीची भावना असते.

मी अशा व्यक्ती विषयी बोलत आहे ..ते तूमच्या आयुष्यात असतात,त्यांच्या बरोबर तूम्ही खूप वेळ पण घालवला असतो,काही गोष्टी आपल्या खास त्यांना सांगतिल्या पण असतात,सगळे मनमोकळे पणांनी त्यांच्याशी तूम्ही बोलत पण असतात ,पण जेव्हा तूम्हाला एखादी गरज पडते तेव्हा तूमच्या शब्दाला मान देउन तूम्हाला संकटाच्या वेळेत मदत करणारे हे बोटावर मोजण्या इतके असतात,सहवास खूप जणांचा तूम्हाला लाभतो पण साथ फक्त जे तूम्हांला आपलं मानतात मनापासून तेच साथ देतात..

मित्राचे उदाहरण घ्या ,लहानपणापासून कितीतरी मित्र तूमच्या आयूष्यात येउन गेले असतील,त्या त्या टप्यामध्ये वेगवेगळे मित्र तूमचे बनतात..फेसबूक वर तर कमीत कमीत १००० च्या आसपास सगळयांचे मित्र असतील ,पण मोजकेच अशे मित्र तूमचे असतात की ते तूमची शेवटपर्यंत वास्तव दुनियेमध्ये तूमची साथ देतात.

साथ देणारे आयुष्यात कोणत्याही जगाच्या कोपऱ्यात असु देत ,वेळ आली की नक्की तूमची मदत करणार.पण आजूबाजूला असणारे ,काही जण आपली सगळी परिस्थिती जाणून असणारे योग्य वेळेस तूमची मदत नाहीत करणार..कारण त्यांनी तूम्हाला मनापासून आपले म्हंटलेले नसते..

जो माणूस तूम्हाला आपलं म्हणतो तो चांगल्या काळात पण तूमच्या सोबत असतो आणि वाईट काळात पण तूमच्या सोबत असतो.. जो माणूस तुमचा नसतो तो तूम्हाला जेव्हा मदत लागते तेव्हा तो बघ्याची भूमिका घेतो..पण जो माणूस तूमचा असतो जो कसल्याही परिस्थिती त्या गोष्टी वर मार्ग काढण्यात तूमची मदत करेन..

काही दिवसापूर्वी मी एक सामाजिक मॅसेज टाईप केला की एक सामाजिक कार्यात मदत करण्यासाठी काही रक्कम पाठवा.. वेगवेगळया जिल्हयातून निधी आला..पण जवळच्या सहवासात असल्या लोकांनी त्याला महत्व दिले नाही..सांगण्याचे तात्पर्य की तूमच्या शब्दाला जो किंमत देतो तो तूमचा खरा हितचिंतक..

ज्या माणसाला तूम्ही अडचण सांगतात आणि तो माणूस लगेच तूमची मदत करतो ,तो खरा तूमची साथ देणारा..

जरी आता काही जण जवळ नसले पण जेव्हा तूमच्या वर अडचण येईल तेव्हा ते नक्की मदत करतील ते म्हणजे तूमचे खरे हितचिंतक

काही जणांना तूमच्या अडचणी माहीत असतात, ते बोलता- बोलता त्या गोष्टी उकरून काढून तूम्हाला टोमणे पण मारतील..हेच आपल्याला ओळखता आले पाहिजे की सहवास सगळया बरोबर होतो आपला, पण यातले आपले कोण हे पण आपल्याला ओळखता आले पाहिजे..

कोणाशी आपल्याला वैर आणायचं नाही पण कधी कधी आपण एखाद्याला खूप मदत करतो ,त्याच्या अडचणीच्या वेळेस आपण मदत करतो,आणि आपली अडचणीची वेळ आली की हा पळ काढतो,अशा माणसांना आपल्याला ओळखता आले पाहिजे..सगळयांशी प्रेमाने आपण वागलेच पाहिजे यात काय दुमत नाही..कूणाला वाईट पण नाही बोलायच,कोणाशी वैर पण ठेवायचे नाही,पण आपली माणसं कोण आहेत ते पण ओळखता आले पाहिजे ,नाहीतर कधी कधी काय होते की आपला वेळ अशा माणसांबरोबर जातो जे आपले नव्हतेच ,म्हणजे काही जण तूमचा वापर करून घेतील आणि वापर संपला की तूमच्या कडे फिरकून पण बघणार नाहीत…

तूमच्या आयुष्यात काय चालू आहे हे पण त्यांना माहित नसते..

तूम्हाला कशाची गरज आहे का हे पण त्यांना माहित नसते.

तूम्ही अडचणीत आहात का हे पण त्यांना माहित नसते.

आयुष्यात सर्वांना मदत करायची ,भेदभाव नाही करायचा पण शेवटी आपलं कोण आहेत जीवलग, ते तर कळायला हवे ना..

म्हणूनच आज च्या लेखाचे शिर्षक आहे सहवास खूप जणांचा पण साथ मात्र काहीच जणांची..

लेखक : राम ढेकणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!