Social

स्वप्नदोष : चला बोलूया या पण विषयावर..

दिवसभर अभ्यास करुन आल्यानंतर रात्री मोबाईल डवचत डवचत मी झोपी जातो.आपल्यातल्या बहूतेक सर्वजणांना ही सवय असेलच ..आणि नसेल तर तूमचे अभिनंदन की तूम्ही काल्पनिक दुनिये पासून दूर आहात..

पण मी मोबाईल चा वापर रात्री करतो हे मी मान्य करत आहे..कारण कधी कधी एकटे राहण्यापेक्षा मोबाईल आपल्याला सुखद काही क्षण देउन जाते.मोबाईलचा वापर करत असताना ,मनोरंजनाचे व्हिडीयो पाहत असताना आजकाला फेसबूक असेल किंवा बाकीच्या सोशल ठिकाणावर सर्रास असलीन व्हिडीयो फिरत असतात..मग अशा प्रकारचा एखादा दुसरा व्हिडीयो माझ्याकडून पाहिला जातो..त्यावेळेस त्या क्षणाला त्या गोष्टी करण्याची इच्छा होते..तो व्हिडीयो बघून झाल्यावर आणि मोबाईल वापरून झाल्यावर मी झोपी जातो..

तसेच याच विषयावर मित्रामार्फत चर्चा झाल्यावर तो विषय आपल्या डोक्यामध्ये राहतो..त्याच्याशी निगडीत आपल्याला स्वप्न पडतात. अचानक रात्री पहाटे पहाटे किंवा कधी कधी १ ते २ मध्ये आपण स्वप्नात कुठेतरी गेलेले असतो आणि आणि कोणाशी तरी भेटतो आणि आपण शारीरिक संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न करतो ,प्रत्यक्ष जी क्रिया आहे ती क्रिया स्वप्नात करतो आणि ही क्रिया करत असताना आपल्या शरिरातून वीर्य बाहेर टाकले जातात..काही सेकदांच्या आत आपल्याला जाग यायच्या अगोदर ही क्रिया होते..यालाच आपण स्वप्नदोष म्हणतो..,एक चिकट चिकट पांढरा रंगाचा वीर्य बाहेर टाकले जातात..

त्याला वेगवेगळ्या संज्ञा पण आहेत ,नाईट फॉल, वीर्यपतन ,वीर्य गळणे,स्वप्नातील ओळसर पणा,स्वप्नावस्था…

ही क्रिया वाईट नाही किंवा आपण काही वाईट करत आहात हे पण नाही,तसेच स्वप्नदोष कोणाला होतात..हे पण आपल्याला माहित असणे गरजेचे आहे..स्वप्नदोष हे तरूण मुलांना जास्त करून आणि जे शारीरीक संबंध निर्माण करत नाहीत. वयात आलेत पण शारीरीक संबंध निर्माण करत नाहीत..आणि त्या गोष्टीचा विचार मनात आणतात तसेच आवती भोवती याच विषयाशी चर्चा करतात त्यांना हा स्वप्नदोष होत असतो..

ही एक नैसर्गिक क्रिया आहे..यात काय लपवण्यासारखे किंवा लाजण्यासारखे काहीही नाही..पण आपल्या समाजात या गोष्टी साध्या कोणी बोलत पण नाही..यांना गरज सुध्दा वाटत नाही की आपल्या आसपास तरूण असलेल्या मुलांना याबद्दल बोलावे ,याबद्दल त्यांना माहिती द्यावी..

स्वप्नदोष कधी थांबत असते तर ती जेव्हा तूम्ही संभोग करता किंवा आपल्या शरीराला ती क्रिया मी करत आहे याची जाणीव करून देतात म्हणजे हस्तमैथून करत असाल तर स्वप्नदोष होणार नाही..

दुसरा याच्या वर उपाय आहे की आपण व्यायाम जर करत असाल तर तूम्हाला स्वप्नदोष शक्यतो होत नाही..कारण व्यायाम केल्याने रात्री दुसरे विचार येत नाहीत असे मी वाचलेले आहे..प्रयत्न करून बघा जर स्वप्नदोष तूम्हाला थांबवायचा असेल तर..

तरूण मुलामध्ये हार्मोनल काही बदल घडतात .त्यामुळे आपल्या शरीरात जास्त प्रमाणात वीर्य किंवा शुक्राणू तयार होत असतात..ते बाहेर टाकणे गरजेचे असते,त्यामुळे रात्री आपल्या स्वप्नात जर असलीन विषय आला की स्वप्नदोष होतो.

याच्या वर उपाय हा आहे की जर तूम्हाला स्वप्नदोषापासून मुक्ती हवी असेल तर रात्री झोपण्याच्या अगोदर अंघोळ करावी असे मी वाचले आहे ,तूम्ही प्रयत्न करून पाहू शकता..

दुसरा पर्याय असा आहे की कामउत्तेजक व्हिडीयो पाहू नका ,तसेच चर्चा या विषयाची करू नका..असे मी वाचलेले आहे..हे सगळे उपाय आपण करून पाहावे..

माझा अनुभव सांगायचा झाला तर १५ दिवसातून सरासरी मला हा स्वप्नदोष होतो..किंवा खूपच मी व्हिडीयो पाहिले तर आठवडयातून एकदा सुध्दा हा स्वप्नदोष मला होतो.

प्रत्येकासाठी कालावधी वेगवेगळा असु शकतो,काही जण दररोज कामउत्तेजक व्हिडीयो पाहत असतील तर त्यांना दररोज पण होउ शकतो..जेवढा जास्त वेळ तुम्ही त्याच त्याच गोष्टीचा विचार करणार असाल तर तुम्हाला दररोज सामोर जावे लागेल..पण काही जणांनी असे पण म्हंटले आहे की हस्तमैथून नेहमी करणाऱ्या तरूण मुलांना स्वप्नदोष होत नाही..पण त्याचे दुष्परिणाम असतील तर त्याचा पण विचार करा..स्वप्नदोष या विषयी जास्तीत जास्तीत माहिती गोळा करा..त्यावर काय उपाय असतील तर ते पण आपल्याला मित्रांना सांगा..काही जण जास्तच आहारी गेले असतील तर त्याचे काय दुष्परिणाम होत असतील तर ते पण आपल्याला मित्रांना सांगा..या विषयावर बोलायला लाजू नका,काय आपण चूकीचे करत नाही पण प्रत्येक गोष्टीला काहीतरी मर्यादा असते ती मर्यादा काय आहे याची माहिती गोळा करा..आणि आपल्या मित्राबरोबर त्यावर विचारविनमय करा..

लेखक : राम ढेकणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!