BusinessSocial

आपल्या शेत जमिनीचा नकाशा मोफत डाऊनलोड करा दोन मिनिटात आपल्या मोबाईलवर. land record

शेतात जाण्यासाठी नवा रस्ता काढायचा असेल किंवा जमिनीच्या हद्दी जाणून घ्यायची असतील तर शेतकऱ्याकडे त्याच्या जमिनीचा नकाशा असणं आवश्यक असतं. आता सरकारनं सातबारा आणि आठ-अ उताऱ्यासोबत जमिनीचा नकाशा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. आता आपण गावाचा आणि शेतजमिनीचा नकाशा कसा काढायचा, याची सविस्तर माहिती पाहणार आहोत. land record

Click Here

जमिनीचा नकाशा कसा पाहायचा ?

मिनीचा नकाशा ऑनलाईन काढण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला खाली दिलेल्या वेब साईट वर जायचं आहे.
या पेजवर डाव्या बाजूला तुम्हाला Location हा रकाना दिसेल. या रकान्यात तुम्हाला तुमचं राज्य, कॅटेगरी मध्ये रुरल आणि अर्बन असे दोन पर्याय दिसतील. जर तुम्ही ग्रामीण भागात असाल, तर रुरल हा पर्याय निवडायचा आहे आणि शहरी भागात असाल, तर अर्बन हा पर्याय निवडायचा आहे.
त्यानंतर तुमचा जिल्हा, तालुका आणि गाव निवडायचं आहे आणि सगळ्यात शेवटी village map यावर क्लिक करायचं आहे

➡️ अधिक माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचा फिन मराठी व्हॉट्सॲप ग्रूप

आता जमिनीचा नकाशा कशा काढायचा ते पाहूया. land record

या पेजवर search by plot number या नावानं एक रकाना दिलेला आहे.इथं तुम्हाला तुमच्या सातबारा उताऱ्यावरील गट क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर मग तुमच्या जमिनीचा गट नकाशा ओपन होतो.होम या पर्यायासमोरील आडव्या बाणावर क्लिक करून आणि मग वजाबाकीचं (-) बटण दाबून तुम्ही पूर्ण नकाशा पाहू शकता.

ही पण वाचा:

प्रत्येक गावातील 5 शेतकऱ्यांना 10,800 रुपयांचे अनुदान मिळणार असून, या शेतीसाठी प्रशिक्षणही दिले जाणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!