SocialTrending

शेत जमीन खरेदी साठी 100% अनुदान लगेच पहा शासन निर्णय Jamin Kharedi Anudan

या पोस्ट मध्ये आपण आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने आदिवासी बांधवांसाठी राबविण्यात येत असलेली जमीन खरेदी करण्यासाठी राबविण्यात येणारी आदिवासी स्वाभिमान व सबलीकरण योजना विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.Adivasi yojana 2022 maharashtra information in marathi आदिवासी बांधवांना स्वाभिमानाने जगता यावे याकरिता त्यांना शासन जमीन खरेदी करण्यासाठी अनुदान देत आहेत. जमीन खरेदीला शासनाचे १००% अनुदान. ही योजना आपल्या महाराष्ट्र राज्यात कशाप्रकारे राबवली जात आहे? अनुदान, कागदपत्रे या विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. Jamin Kharedi Anudan

ही पण वाचा:

👇👇👇

कृषी राज्य सरकार यांत्रिकरण योजना अर्ज ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्र २०२२

आपल्या महाराष्ट्र शासनाच्या जमिनीवर आदिवासी बांधव खरेदी करण्यासाठी १००% अनुदान दिले जात आहे. आपली महाराष्ट्र राजधानी आदिवासी बांधवांसाठी हीमान व सर्वीकरण योजना आहे. या खरेदीच्या अंतर्गत आपल्या महाराष्ट्रातील विविधता ही आदिवासी बांधवांना चार जिरायती किव्हा दोन एकर बागती जमीन देण्यासाठी जात आहे.Jamin Kharedi Anudan

याअंतर्गत आदिवासी बांधवांना जमीन खरेदी करण्यासाठी 100% अनुदान देण्यात येत आहे. या पूर्वी या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना १००% अनुदान देण्यात येत नव्हते. 50 % बिनव्याजी कर्ज व 50 % रक्कम असे या योजनेचे स्वरूप होते. त्यानंतर या आदिवासी जमीन खरेदी अनुदान योजनेत बदल करून ही योजना १००% अनुदान वर राबविण्यात येत आहे.

◼️आदिवासी जमीन खरेदी अनुदान योजना लाभार्थी निवड प्रक्रिया:-

योजने अंतर्गत अर्ज केल्यानंतर लाभार्थ्यांची निवड ही त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांच्या मार्फत नेमण्यात आलेली समिती करीत असते. त्या समितीचे अध्यक्ष हे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी स्वतः असतात. या योजने अंतर्गत लाभार्थी यांची निवड करत असताना अर्ज हे योजनेच्या लक्षांक पेक्षा जास्त आल्यास अर्जदारांच्या चिठ्या काढून निवड करण्यात येणार आहे.

या आदिवासी सबळीकरण व स्वाभिमान योजनाअंतर्गत जमीन खरेदी करताना जर जमीन बागायत असल्यास 8 लाख रुपये एका एकर साठी तसेच जमीन ही जिरायत असल्यास 5 लाख रुपये एक एक एकर अशी मर्यादा आहे. या योजने अंतर्गत लाभार्थी निवड करत असताना परितक्त्या स्त्रिया, विधवा स्त्रिया यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. Jamin Kharedi Anudan

ही पण वाचा:

👇👇👇

शेतकऱ्यांन साठी धक्कादायक बातमी या जिल्ह्यात आढळली अतिविषारी घोणस आळी..

◼️आदिवासी सबलीकरण व स्वाभिमान योजना अंतर्गत लाभ:-

योजने अंतर्गत भूमीहीन आदिवासी बांधवांना 4 एकर कोरडवाहू जमीन किंवा 2 एकर ओलिताखालील जमीन खरेदी करण्यासाठी १०० टक्के इतके अनुदान हे शासनातर्फे देण्यात येत आहे. जर जमीन ही कोरडवाहू चार एकर पेक्षा जास्त असल्यास सुद्धा या योजनेत लाभ मिळवून घेता येतो. या आदिवासी जमीन खरेदी योजना अंतर्गत लाभ घेण्यासाठी वय मर्यादा ही १८ वर्षे ते ६० वर्षे असणार आहे. Jamin Kharedi Anudan

◼️आदिवासी जमीन खरेदी अनुदान योजना अंतर्गत जमीन खरेदीचे नियम व अटी:-

अंतर्गत ज्या आदिवासी बांधवांना लाभ मिळेल त्या लाभार्थ्यांना त्यांना मिळालेली जमीन ही भाडेपट्ट्याने देता येणार नाही. तसेच ही जमीन त्या लाभार्थीना विकता येणार नाही. ही जमीन आदिवासी बांधवांना स्वतः कसण्यासाठी देण्यात आलेली आहे. कारण ही जमीन आदिवासी बांधवांना स्वाभिमान व सबलीकरण पुरविणारी आहे. या योजने अंतर्गत जी जमीन आपण खरेदी करणार आहोत ती जमीन ही पोटखराब, नापीक, खडकाळ जमीन नसावी.

जमीन ही सुपीक कसण्यायोग असावी लागते. त्या जमिनीवर बोजा नसला पाहिजे. कर्ज नसले पाहिजे. बँकेची  बाकी नसल्याचे no dues प्रमाणपत्र जोडावे लागते. या योजनेकरिता लाभ घेण्यासाठी अर्ज जर जमीन खरेदी करणारा लाभार्थी शेतकरी तसेच जमीन विक्री करणारा शेतकरी दोघांना करायचा आहे.

अश्या प्रकारची आपल्या महाराष्ट्र राज्यातील भूमिहीन आदिवासी बांधवांना स्वाभिमानाने जगता यावे, तसेच या बांधवांचे सबलीकरण व्हावे या उद्देशाने ही आदिवासी जमीन खरेदी अनुदान योजना महाराष्ट्र राज्यात राबविण्यात येत आहे.

➡️ अधिक माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचा फिन मराठी व्हॉट्सॲप ग्रूप

अनुदान योजना अर्ज download करण्यासाठी

👇👇👇

येथे क्लिक करा.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!