SocialTrending

मित्र चांगले तर तूमचे जीवन चांगले

आपण ज्यांच्या बरोबर राहतो त्या व्यक्तीचा आपल्या जीवनावर खूप परिणाम होतो हे ९९ टक्के सत्य आहे ,हे आपल्याला मान्य करावे लागेल..क्वचितच एखादी व्यक्ती असते की त्याच्यावर आजूबाजूच्या मित्रपरिवाराचा परिणाम त्याच्या जीवनात होत नसेल..

तूम्ही कोणत्या मित्राबरोबर आज आहात त्या नुसार तूमचे भविष्य ठरणार आहे..जर तूमच्या आजूबाजूला वेसन करणारे असतील तर काही दिवसातच तूम्ही पण व्यसनी होणार .

जर तूमच्या आजूबाजूला जर अभ्यास करणारे असतील तर तूम्ही पण अभ्यास करणार

जर तूमच्या आजूबाजूला मज्जा करणारे ,मस्ती करणारे ,सतत वेळ वाया घालवणारे असतील तर तूम्ही पण त्यांच्या सारखे होणार

जर तूमच्या आजूबाजूला प्रेम प्रकरण करणारे असतील ,सतत प्रेमाच्या गोष्टी बोलणारे असतील तूम्ही त्या गोष्टी ला बळी पडणार

जर तूमच्या आसपास मेहनती ,कष्टाळू ,प्रामाणिक व्यक्ती असतील तर तूम्ही पण त्यांच्या सारखे होणार

जर तूम्ही १ टक्कयामध्ये येत असाल तर या सर्व जणांचा तूमच्या वर परिणाम कसलाच होणार नाही..

तूमचा मनावर ताबा असेल कोणत्या गोष्टी चांगल्या कोणत्या गोष्टी चांगल्या नाहीत याची तूम्हाला माहिती असेल आणि तूमचे तूमच्या नियंत्रण असेल तर तूमच्या वर या सर्व गोष्टीचा परिणाम होणार नाही.

बहूतेक आपण ९९ टक्के मध्ये येतो मग आपली मित्र निवडताना आपण काळजी घेतली पाहिजे,

ज्या मित्राचे आयुष्यात काहीच ध्येय नाही अशा मित्राबरोबर जर तूम्ही तूमचा वेळ खर्च करत असाल तर एक दिवस तो मित्र तूम्हाला त्याच्यासारखाच बिनाध्येय असलेला व्यक्ती बनवून ठेवतो,

आता काही जणांना माझ्यासारख्या व्यक्तींना सवय खूप घान आहे की कोणताही व्यक्ती माझ्यासमोर आला की मी त्याला आहे तसा स्वीकारतो आणि त्यामध्ये बदल घडवण्याचा प्रयत्न करतो पण होते असे की माझ्या चांगल्या सवयी त्याला लागतात पण त्याची एखादी सवय नाही म्हटंले तरी लागून जाते..

माझे असे स्वत:चे असे मत आहे की मैत्री मी बघून करत नाही की तो चांगला आहे की वाईट,आपल्या समोर जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीला चांगले आपल्या कडून काय देता येईल या विचाराने मी मैत्री करतो ,माझ्या मुळे एखादयाचया जीवनात काही बदल झाला तर मला आनंद मिळतो ,पण या मध्ये वेळ खूप जातो ,कारण् एखादया मध्ये बदल करायचा सोपी गोष्ट नाही..

पण ज्या वेळेस तूम्ही अभ्यासाच्या अवस्थेमध्ये असता तेव्हा मात्र अशा मैत्री तूमच्या जीवनात खूप महाग पडू शकतात,कारण त्याचा अप्रत्यक्षपणे अभ्यासावर परिणाम होतो,

आता माझे अशे काही मित्र आहेत ते माझ्या खूप जवळचे आहेत तरीही येथे त्यांची चूकीची बाजू मला सांगावीच लागेल,एक मित्र असा आहे की ,अभ्यास करत असताना अचानक म्हणतो चला की चहा प्यायला,मग चहा प्यायचा झाला की त्या ठिकाणाहून निघून यायचे सोडून तो तासन तास तेथेच बसून गप्पा मारत बसतो ,म्हणजे त्याला वेळेचे काहीही देणे घेणे नाही..

मग अशा व्यक्ती मुळे तूमच्या अभ्यासावर परिणाम होतो,

काही मित्र प्रेमात पडतात आणि त्याच्या डोक्यात कायम प्रेम आणि प्रेम अशाच गोष्टीचे विचार फिरत असतात ,मग काय आपल्या बरोबर पण त्याच विषयावर ते बोलतात, आणि आपल्या मनात पण तेच विषय फिरू लागतो ,मग अशा अनेक वेगवेगळया मित्राच्या सवयी मी बधत आलेलो आहे ज्या अभ्यास करायच्या वयामध्ये त्या खूप हानीकारक आहेत आणि त्याचा तूमच्या जीवनावर परिणाम होता,

मग काय अशा मित्राबरोबर तर अशा विषयावर आपण चर्चा करायची नाही,आणि शक्य तेवढे आपण आपल्या कामात म्हणजे आपल्या अभ्यासामध्ये मग्न रहायचे,नाहीतर त्याचा परिणाम नक्की आपल्याला भोगावा लागेल..मैत्री तोडायची नाही पण अशा लोकांपासून त्या विषयाच्या चर्चा करताना चार कोस दूर राहण्याचा प्रयत्न करायचा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!