Social

मोठ्या मनाचे व्यक्ती

मी ज्या ठिकाणी अभ्यास करतो त्या ठिकाणी जर महिन्याच्या शेवटच्या रविवारी एक कार्यक्रम असतो आणि त्या कार्यक्रमामध्ये भगवत गीता आणि स्वामी विवेकानंद याविषयावर एक तास प्रवचन तसेच विचारांशी देवाण घेवाण आणि मार्गदर्शन होत असते..मार्गदर्शन झाल्यावर सामाजिक कार्यात नेहमी पूढे असणारे काही व्यक्ती आमच्या जवळ येतात आणि आमच्याशी संवाद साधता,अभ्यास चालू आहे ना ,काय अडचण असेल तर सांगत जावा ,व्यायाम करत जावा तसेच स्वामीजींचे पुस्तके पण वाचत जावा त्यातून घेण्यासारखे खूप आहे,खूप काही शिकायला तूम्हाला मिळेल अशा विषयावर चर्चा करता आणि परत पूढच्या महिन्याच्या शेवटच्या रविवारी कार्यक्रमाला आम्हाला भेटायला येतात..

मग एक दिवस ते महान व्यक्ती आमच्याशी बोलत असताना म्हणाले की आजूबाजूच्या परिसरातील विद्यार्थ्यांना सांगत जावा की या ठिकाणी अभ्यासिका आहे,जे गरीब आहेत अशा लोकांना तर अवर्जून सांगा ,आपण जर तो खरच गरीब असेल तर त्याला काही पुस्तकांची मदत करू ,या अशा चांगल्या वातावरणात अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांना सांगत जावा अशा काही गोष्टी आम्हाला सांगितल्या आणि नंतर त्यांनी आमचा निरोप घेतला..

मग आमच्या अभ्यासिकेमध्ये असाच एक आमच्या सारखा सामान्य कुटुंबातून आलेला तरूण माझ्या नजरेस आला आणि त्याला शिक्षणांची आवड असल्यामुळे तो अभ्यासिकेमध्ये आला होता..काहींना काही वाचत बसत असे..त्याची बारावी आताच झालेली होती..पैशाची अडचण असल्यामुळे त्याने बी.ए. ला प्रवेश घेतले..बी.ए. करुन त्याच्यासाठी बाकीचे मार्ग बंद होणार होते ,पण पैशाच सोंग करता येत नाही,म्हणून मी पण त्याला म्हटले की तू मेहनत कर ,चांगला अभ्यास कर आणि पदवी संपेपर्यत चांगला अभ्यास करून अधिकारी हो..तो पण तयार झाला आणि अभ्यासाला लागला..

काही दिवसात परत शेवटचा रविवार असल्यामुळे ते सदस्य कार्यक्रमासाठी आले.मग गेल्यावेळेस त्यांनी सांगितलेले माझ्या लक्षात होते मी मग या तरूणाला म्हटले की जा आणि तूझी अडचण या व्यक्तीच्या कानावर घाल, ते तूला नक्की मदत करतील ,कारण त्यांनी अशी अगोदर मदत केली आहे हे मी काही जणांकडुनसुध्दा ऐकले होते..

त्या तरूणांने माझे ऐकले आणि त्या महान व्यक्तीच्या कानावर सर्व अडचण सांगतिली..त्यांनी एकून घेतले आणि नंतरच्या वेळेस जेव्हा हाच विषय त्यांच्या कानावर घातला तेव्हा त्यांनी या सर्वगोष्टी लिहून आणायला सांगितल्या , मग या तरूणांने सुध्दा त्या व्यक्तींने सांगितल्या प्रमाणे सर्व क्रिया केली आणि शेवटी या तरूणाला आर्थिक मदत मिळाली.

त्या धनाचा वापर करून त्याने उच्च शिक्षण घेण्यासाठी एका ठिकाणी प्रवेश केला..

पण मदत करताना त्या महान व्यक्तींने एक अट घातली आहे ..ती अट म्हणजे त्या तरूणाशी प्रगती झाली तरच पूढची मदत तूला भेटेल,तू स्वत:मध्ये बदल केलास ,आपल्या शैक्षणिक क्षेत्रात प्रगती केलास तरच तूला मदत मिळेल..

अशी त्यांनी सौम्य अट ठेवली आणि त्या तरूणांने ती मान्य पण केली.

आज तो उच्च शिक्षण घेउन अधिकारी होण्याचे स्वप्न बघत आहे ..

आज त्याला एक नविन दिशा प्राप्त झाली आहे.

आज त्याचा माणूसकीवर विश्वास अजून घट्ट झाला आहे..

आज तो एक चांगला नागरिक बनण्याचा प्रयत्न करेल

आणि पूढे जावून तो पण गरजू लोकांना नक्कीच मदत करेन

आज त्याला समाजाकडून मदत मिळाली आहे तो पूढे चालू नेहमी समाजातील अडचणींना धावून येईल

आज या गोष्टी मुळे त्याच्यातील चांगूलपणा जीवंत राहील आयुष्यभर

पण हे सर्व घडेल त्या महान व्यक्तीच्या मदतीमुळे,

आणि जाता जाता त्या व्यक्तींने या तरूणाला एक गोष्ट सांगितली की हे कोणाला सांगू नको की मी तूला मदत केली आहे.

म्हणजे किती महान म्हणायचं अशा व्यक्तींना की मदत करतात आणि मी केली आहे हे कोणाला सांगू नकोस..

अशा महान व्यक्तींची आपल्या भारताला गरज आहे..

जे पैशा पेक्षा माणसांना किंमत देतात.

ज्यांना भारतातील गरीबीची जाण आहे

जे निस्वार्थ सेवा करत आहेत..अशा मोठया मनाच्या व्यक्तींना दिर्घ आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!