जे लाभार्थीं संजय गांधी योजना २०२४ मध्ये अर्ज करणार आहेत अशा सर्व लाभार्थ्यांसाठी एक सुवर्णसंधी आहे.
ज्या व्यक्तींना संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत २०२४ मध्ये दुप्पट अनुदान प्राप्त करायचे आहे अशा व्यक्तींना दुप्पट अनुदान प्राप्त करण्यासाठी पात्रतेच्या अटी कोणकोणत्या ठेवण्यात आल्या आहेत?
ह्या साठी नोंदणी कशी अणि कुठे करायची आहे ह्या संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत किती अनुदान देण्यात येणार आहे हे सर्व आपणास माहिती असणे आवश्यक आहे.
म्हणून आजच्या लेखात आपण संजय गांधी निराधार दुप्पट अनुदान प्राप्त करण्यासाठी पात्रतेच्या अटी काय आहेत यासाठी नोंदणी कुठे अणि कशी करायची इत्यादी माहिती सविस्तरपणे जाणुन घेणार आहोत.
संजय गांधी निराधार योजना काय आहे?
संजय गांधी निराधार ही एक शासकीय योजना आहे जी समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना अर्थसाहाय्य प्रदान करते.
संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे?
संजय गांधी निराधार ह्या योजनेचे उद्दिष्ट समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना अर्थसाहाय्य प्रदान करणे हे आहे.
संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी कोणकोण आहेत?
विधवा,दिव्यांग,अनाथ,परीतक्त्या,दुर्धर आजारग्रस्त,देवदासी,अत्याचारीत महिला,वैशया व्यवसायातुन मुक्त झालेल्या महिला,तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या कुटुंब प्रमुखाची पत्नी,३५ वर्षांवरील अविवाहित निराधार स्त्रिया इत्यादी दुर्बल निराधार घटक हे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी असणार आहेत.
संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे कोणकोणती आहेत?
संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत –
- विहित नमुन्यातील अर्ज
- वयाचा दाखला
- आधार कार्ड झेरॉक्स
- रेशनकार्ड झेरॉक्स
- बॅक खाते पासबुक झेराॅक्स
- निवडणूक ओळखपत्र
- रहिवासी दाखला
- अर्जदाराचा पासपोर्ट साईज फोटो
संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी ठेवण्यात आलेल्या लाभार्थीं पात्रतेच्या अटी कोणकोणत्या आहेत?
लाभार्थी किमान पंधरा वर्षांपासून महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे.
विधवा महिला अर्जदाराकडे पतीचा मृत्यू दाखला असणे आवश्यक आहे.
दिव्यांग लाभार्थ्यांने जिल्हा शल्य चिकित्सकाने दिलेला दिव्यांग असल्याचा दाखला देणे आवश्यक आहे.
किमान ४० टक्के अपंगत्व असायला हवे.
अर्जदार अनाथ असल्यास त्याच्याकडे अनाथ असल्याचा दाखला असणे आवश्यक आहे.
अर्जदार दुर्धर आजारग्रस्त असल्यास त्याच्याकडे दुर्धर आजार प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
उत्पन्नाचा दाखला आपल्याजवळ असणे आवश्यक आहे.दिव्यांग लाभार्थींकरीता उत्पन्नाची कमाल मर्यादा ५० हजार पर्यंत ठेवण्यात आली आहे.अणि सर्व इतर लाभार्थीं करीता कमाल उत्पन्न मर्यादा २१ हजार इतकी ठेवण्यात आली आहे.
संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ कोणत्या वयोगटातील व्यक्तींना मिळणार आहे?
किमान १८ ते ६५ वर्ष वयोगटातील लाभार्थीं ह्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ घेऊ शकतात.ज्यांचे वय १८ पेक्षा कमी आहे पालकामार्फत ह्या योजनेचा लाभ प्राप्त करू शकतात.
संजय गांधी निराधार अनुदान योजनेत दिला जाणारा लाभ –
संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी अर्ज मंजूर झाल्यावर आपल्याला दरमहा पंधराशे रुपये दिले जातात.
महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग वृदध निराधारांना संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत मानधन दिले जाते.आता २०२४ पासुन संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना पोस्ट बॅकेच्या माध्यमातून थेट घरपोहोच मानधन दिले जाणार आहे असे राज्य शासनाने सांगितले आहे.
संजय गांधी निराधार अनुदान अणि श्रावणबाळ राज्य सेवा निवृत्ती योजनेच्या लाभार्थ्यांच्या मानधनात दरमहा एक हजार रुपये वरून सध्या पंधराशे रुपये इतकी वाढ करण्यात आली आहे.
तसेच डिसेंबर अखेरचे मानधन देखील सर्व लाभार्थ्यांना देण्यात आले आहे असे हसन मुश्रीफ यांनी सांगितले आहे.
लवकरच आता हे मानधन वाढवून पंधराशे रुपये वरून तीन हजार रुपये इतके करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवण्यात येणार आहे.पोस्ट बॅकेच्या मदतीने सर्व प्रकारचे मानधन घरपोहोच मिळण्याची सोय केली जाणार आहे.
तसेच आर्थिक निकषांच्या मर्यादेत देखील वाढ करण्यात येणार आहे.दिव्यांग वृदध निराधारांना मानधन देताना योजनेचे निकष शिथिल करण्यात येणार आहे.
संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे अणि कसा करायचा आहे?
संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी आपणास अर्ज करायला तहसिल कार्यालयातील सेतु केंद्रात जाऊन आॅनलाईन पदधतीने अर्ज सादर करायचा आहे. आपले सरकार महा आॅनलाईन डाॅट जिओव्ही डाॅट इन वर लाॅग इन करून देखील आपणास अर्ज करता येतो.पण ज्या लाभार्थीकडे आपले महाआॅनलाईन सेवा केंद्र नाहीये ते तहसील कार्यालयात जाऊन योजनेसाठी अर्ज करू शकतात.