FarmingSocialTrending

Onion: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कांदा पोहचणार 4/5 हजारांवर, ‘या’ मार्केटमध्ये कांद्याला प्रतिक्विटल 3515 रू. दर

दिवाळीच्या नऊ दिवसांच्या सुट्टीनंतर सोमवारी लासलगाव बाजार समितीत लिलाव सुरू होताच कांद्याच्या दरात वाढ झाली. नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये उन्हाळ कांद्याला समाधानकारक भाव मिळाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. दिवाळीपूर्वी 21 ऑक्टोबर रोजी लासलगाव मंडी समितीकडे 14 हजार 792 क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक झाली होती. Onion

राज्यानुसार व जिल्हा नुसार कांदा बाजार भाव पहा

अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

नवीन कांदा भाव

तर बाजारभाव 600 ते 2350 रुपये तर सरासरी 1860 रुपये प्रतिक्विंटल होते. दीपावलीनंतर सोमवारी समितीत उन्हाळ कांद्याची 11 हजार 846 क्विंटल आवक होऊन 851 ते 3515 तर सरासरी 2450 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.

हे पण वाचा

PM Kisan Tractor Scheme: अरे वा! शेतकऱ्यांसाठी खुशखबर ट्रॅक्टर खरेदीवर मिळणार 50% अनुदान आजच नवीन अर्ज सुरू

या वर्षी नवीन लाल कांद्याचा हंगाम

या वर्षी नवीन लाल कांद्याचा हंगाम लांबला आहे कारण परतीच्या पावसाने कांद्याचे नुकसान झाले आहे. कांद्याचा साठा कमी असल्याने भाव वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांना आहे. मात्र, या दरवाढीचा फायदा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कितपत मिळणार, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. Onion

सध्या बाजारात जुना कांदा उपलब्ध आहे.

जुन्या कांद्याचा साठा संपत आहे. तसेच चाळीत साठवलेल्या जुन्या कांद्याच्या प्रतवारीवरही पावसाचा परिणाम झाला असल्याने कांद्याचे भाव वाढले असले तरी त्याचा फार कमी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. चाळीत ठेवलेला कांदा वातावरणातील बदलामुळे कुजला असून त्याचे वजनही कमी झाले आहे.

हे पण वाचा

MSEDCL Bill Payment: राज्य सरकारचा मोठा निर्णय’ ‘या’ शेतकऱ्यांचे 500 कोटी वीज बिल माफ पहा संपूर्ण यादी!

गेल्या पाच महिन्यांपासून कांदा उत्पादक शेतकरी कांदा अत्यंत स्वस्तात विकत आहेत. मात्र, आता शेतकऱ्यांचा कांदा संपत असल्याने कांद्याचे भाव वाढले आहेत. मात्र, वाढलेल्या दराचा फायदा फारच कमी शेतकऱ्यांना होत आहे. – राजाबाबा होळकर, कांदा उत्पादक, लासलगाव. Onion

बिझनेस विषयी माहिती साठी व मदती साठी जाॅईन करा आपल्या जिल्ह्याचा फिन मराठी व्हाॅट्सअप ग्रुप

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!