BusinessSocialTrending

नवीन उद्योग सुरू करू इच्छिता ? तर सरकारचा या योजनेचा लाभ घेण्यासाठी हे वाचाच… government

अनेकांना कोणता ना कोणता उद्योग, व्यवसाय सुरू करण्याची आवड असतेच. परंतु नवीन उद्योग सुरू करण्यासाठी अनेक अडचणी येतात. बेरोजगारी कमी करण्यासाठी सरकारही असे योजना आणते पण त्याची पुरेशी माहितीच नागरिकांपर्यंत पोहोचत नाही. योजना आणते पण त्याची पुरेशी माहितीच नागरिकांपर्यंत पोहोचत नाही. योजना पोहोचल्या तरी त्याची पुर्तत: करण्यासाठी नाकी नऊ येतात. त्यामुळे तरुण उद्योगांकडे येत नाहीत. अशीच एक योजना आहे ती म्हणजे ‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम’ (सीएमईजीपी). या योजनेचा लाभ घेतला तर अनेकांना रोजगारांच्या संधी उपलब्ध होतील. government

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेचा १८ ते ४५ वयोगटातील लाभ घेऊ शकतात. सरकारने रोजगार मिळवून देण्यासाठी ही योजना आणली. उद्योग, व्यवसाय करण्यासाठी इच्छुक असतील‌ त्यांना ‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम’ या योजनेतंर्गत मदत मिळू शकते.

राज्यातील सुशिक्षित, अर्धशिक्षित युवक व युवतींसाठी स्वयंरोजगाराच्या नविन संधी उपलब्ध करून देणासाठी महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री रोजगार निर्मीती कार्यक्रम योजना’ सुरू केला. राज्यातील सर्व जिल्ह्यासाठी ही योजना लागू आहे. छोट्या उद्योजकांना प्रोत्साहन देणे हा याचा उद्देश आहे. या योजनेमुळे सर्व समावेशक विकास होण्यास मदत होईल. छोट्या उद्योगांतून देखील रोजगार निर्मिती होऊ शकते. या योजनेच्या माध्यमातून शहरी व ग्रामीण भागातील युवा पिढीला स्वयंरोजगारासाठी उद्योग उभारायला मदत होईल. government

ही पण वाचा:

प्रत्येक गावातील 5 शेतकऱ्यांना 10,800 रुपयांचे अनुदान मिळणार असून, या शेतीसाठी प्रशिक्षणही दिले जाणार आहे.

हे व्यवसाय करु शकता

थ्रेड बॉल आणि वूलन बॉलिंग लॅचि बनविणे, फॅब्रिक्स उत्पादन, लॉन्ड्री, बारबर, प्लंबिंग, डिझेल इंजिन पंप्स दुरुस्ती, स्प्रेयर्ससाठी टायर व्हॅलसीनीझिंग युनिट अ‍ॅग्रीकल्चर सर्व्हिसेस, बॅटरी चार्जिंग, आर्ट बोर्ड पेन्टिंग/स्प्रे पेन्टिंग, सायकल दुरुस्तीची दुकाने, बॅन्ड पथक, मोबाइल आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे दुरुस्ती, इलेक्ट्रॉनिक उपकरणे दुरुस्ती, ऑफिस प्रिंटिंग आणि बुक बायनडिंग, काटेरी तारांचे उत्पादन, इमिटेशन ज्वेलरी (बांगड्या) उत्पादन, स्क्रू उत्पादन, ENGG. वर्कशॉप, स्टोरेज बॅटरी उत्पादन, जर्मन भांडी उत्पादन, रेडिओ उत्पादन, व्होल्टेज स्टॅबिलिझरचे उत्पादन, कोरीव वूड आणि आर्टस्टिक फर्निचर बनविणे, ट्रंक आणि पेटी उत्पादन, ट्रान्सफॉर्म मोटार पंप/जनरेटर उत्पादन, कॉम्प्यूटर असेंम्बली, वेल्डिंग वर्क, वजन काटा उत्पादन, सिमेंट प्रॉडक्ट, विविध भौतिक हाताळणी उपकरणे तयार करणे, मशीनरीचे सुटे भाग उत्पादन, मिक्सर ग्रिंडर आणि इतर घरगुती वस्तू बनविणे, प्रिंटिंग प्रेस/स्क्रीन प्रिंटिंग, बॅग उत्पादन, मंडप डेकोरेशन, गादी कारखाना, कॉटन टेक्सटाईल फॅब्रिक्समध्ये स्क्रीन प्रिंटिंग, झेरॉक्स सेंटर, चहा स्टॉल, मिठाईचे उत्पादन, होजीअरी उत्पादन, रेडीमेड गारमेंट्सचे टेलरिंग /उत्पादन, खेळणी आणि बाहुली बनविणे, फोटोग्राफी, डिझेल इंजिन पंप संचाची दुरुस्ती, मोटार रिविंडिंग, वायर नेट बनविणे, हाऊसहोल्ड एल्युमिनियम युटेंसिल्सचे मॅन्युफॅक्चर, पेपर पिन उत्पादन, सजावटीच्या बल्बांचे उत्पादन, हर्बल सुंदर पार्लर/आयुर्वेदिक हार्बल उत्पादने, केबल टीव्ही नेटवर्क/संगणक केंद्र, पब्लिक ट्रान्सपोर्ट किंवा रुरल ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस, सिल्क साड्यांचे उत्पादन, रसवंती, मॅट बनविणे, फायबर आयटम उत्पादन, पिठाची गिरणी, कप बनविणे, वूड वर्क, स्टील ग्रिलचे मॅन्युफॅक्चर, जिम सर्विसेस, आयुर्वेदिक औषध उत्पादन, फोटो फ्रेम, पेप्सी युनिट/कोल्ड/सॉफ्ट ड्रिंक, खवा व चक्का युनिट, गुळ तयार करणे, फळ आणि व्हिजिटेबल प्रक्रिया, घाणी तेल उद्योग, कॅटल फीड, दाळ मिल, राईस मिल, कॅन्डल उत्पादन, तेलउत्पादन, शैम्पू उत्पादन, केसांच्या तेलाची निर्मिती, पापड मसाला उदयोग, बर्फ उत्पादन, बेकरी प्रॉडक्ट्स, पोहा उत्पादन, बेदाना/मनुका उद्योग, सोन्याचे दागिने उत्पादन (ज्वेलरी वर्क), चांदीचे काम, स्टोन क्रशर व्यापार, स्टोन कटिंग पॉलिशिंग, मिरची कांडप

अशी नोंदणी

ज्या तरुणांना नवीन उद्योग सुरू करायचे आहेत. त्यांनी ‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम’ योजनेचा लाभ घेण्यासाठी तत्काळ http://maha-cmegp.gov.in सदर संकेतस्थळावर अर्ज दाखल करावेत.

या योजनेचे हे आहेत निकष

– वयोमर्यादा : १८ ते ४५ ( अनुसुचीत जाती, अनुसुचित जमाती, महिला व माजी सैनिक यांना ५० वर्ष)

– शैक्षणिक पात्रता : प्रकल्प रु. १० ते २५ लाखासाठी ७ वी पास, प्रकल्प रु. २५ ते ५० लाखासाठी १० वी पास

– उत्पादन उद्योग : कमाल प्रकल्प मर्यादा ५० लाख असायला हवे

– सेवा उद्योग : कमाल प्रकल्प मर्यादा १० लाख असावी.

प्रकल्प अहवाल खालील विहित निकषांवर आधारीत असणे आवश्यक

– स्थिर भांडवल : मशीनरी रक्कम कमीत कमी ५० टक्के

– इमारत बांधकाम :जास्तीत जास्त २० टक्के

– खेळते भांडवल : जास्तीत जास्त ३० टक्के

– स्वगुंतवणूक : ५ ते १० टक्के

– सीमा मर्यादा : १५ ते ३५ टक्के

– ही योजना नवीन निर्माण उद्योगासाठी तसेच मराठी लिहिता आणि बोलता बंधनकारक आहे

– पात्र घटक : वैयक्तिक, भागीदारी, बचत गट

– पात्र मालकी घटक : वैयक्तिक, भागीदारी, बचत गट

हे लागतील कागदपत्रे

– पासपोर्ट साइज फोटो, आधार कार्ड, जन्म दाखला (शाळा सोडल्याचा दाखला, डोमिसीयल सर्टिफिकेट), शैक्षणीक पात्रता प्रमाणपत्र (आपले शिक्षण किती झाले याचा पुरावा जसे दहावी, बारावी, पदवीचे गुणपत्रक), हमीपत्र, प्रकल्प अहवाल, जातीचे प्रमाणपत्र ( अ. जा., अ. ज. असेल तर), विशेष प्रवर्ग असेल तर प्रमाणपत्र ( माजी सैनिक, अपंग), कौशल्य विकास प्रशिक्षण झाले असेल तर प्रमाणपत्र, लोकसंख्याचा दाखला (२० हजार पेक्षा कमी लोकसंख्या असेल तर), पार्टनरशिप उद्योग असेल तर रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र, अधिकार पत्र व घटना

कर्जासाठी…

– पाच ते १० टक्के स्वतः चे भांडवल

– ६० ते ८० टक्के बँकेचे कर्ज

– ३० महिलांसाठी अनुदान राखीव

– २० टक्के SC/ST साठी अनुदान राखीव

– एक कुटुंब एक लाभार्थी

➡️ अधिक माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचा फिन मराठी व्हॉट्सॲप ग्रूप

ही पण वाचा:

खुशखबर! सोने 810 रुपयांनी स्वस्त स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी! जाणून घ्या आजचे दर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!