ओयो रूम्स स्टार्टअप यशोगाथा

Oyo rooms start up business success story in Marathi

ओयो रूम्स ह्या स्टार्ट अप व्यवसायाचे संस्थापक रितेश अग्रवाल आहेत.

रितेश अग्रवाल यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९९३ रोजी ओडिसा मधील विसमगढक येथे एका मारवाडी कुटुंबात झाला होता.ओरिसा मधील तितलागड येथे त्यांचे बालपण गेले.

रितेश अग्रवाल आपल्या चारही भाऊ बहिणींमध्ये सर्वात लहान होते.

रितेश अग्रवाल यांनी त्यांचे माध्यमिक शिक्षण पुर्ण केल्यानंतर सेंट जाॅन सिनिअर सेकंडरी स्कूल मधुन आपले शिक्षण पूर्ण केले.

अणि मग पुढच्या अभ्यासासाठी त्यांनी दिल्ली येथील शाळा इंडियन स्कुल आॅफ बिझनेस अॅण्ड फायनान्स मध्ये प्रवेश प्राप्त केला.

पण नंतर त्यांनी काॅलेज अर्धवट सोडून दिले कारण त्यांना आयुष्यात काही विशिष्ट ध्येय साध्य करायचे होते जे औपचारिक शिक्षण घेऊन पुर्ण करता आले नसते.

रितेश अग्रवाल अभ्यासात हुशार होते पण अभ्यासाव्यतिरिक्त त्यांना व्यवसायात विशेष रूची होती.

लहानपणापासूनच रितेश अग्रवाल हे स्टीव जॉब्स, मार्क झुकरबर्ग,बिल गेट्स इत्यादी दिग्दज उद्योजकांपासुन खुप प्रभावित झाले होते.

रितेश अग्रवाल यांना प्रवासाची देखील आवड होती म्हणून ते वेगवेगळ्या ठिकाणी फिरण्यासाठी देखील जात असत.देशातील वेगवेगळया ठिकाणी प्रवास करताना रितेश देशमुख यांना एक गोष्ट लक्षात आली.

प्रवासादरम्यान लोकांना मुक्काम करण्यासाठी खुप अडीअडचणींना सामोरे जावे लागते.कधी कधी लोकांना जास्त पैसे खर्च करून देखील चांगले रूम्स मुक्कामासाठी उपलब्ध होत नाहीत.

तसेच काही लोकांना खुप कमी पैशात देखील चांगली जागा उपलब्ध होते.म्हणुन रितेश अग्रवाल यांनी विचार केला की असा एखादा स्टार्ट अप व्यवसाय सुरू करावा ज्याने लोकांच्या गरजा आपणास पुर्ण करता येतील.

तसेच आपणास लोकांना परवडेल अशा दरात चांगले हाॅटेल रूम उपलब्ध करून देता येईल.हाच विचार डोक्यात ठेवून रितेश अग्रवाल यांनी एक आॅनलाईन बुकिंग कम्युनिटीची सुरूवात केली.

फक्त अठरा वर्षाचे असताना रितेश अग्रवाल याने ओरॅवल स्टे प्रा लिमिटेड कंपनीची सुरूवात केली.ओरॅवल हा एक असा स्टार्ट अप प्लॅटफॉर्म होता जो प्रत्येक ठिकाणी उपलब्ध असलेल्या हाॅटेलची यादी करत अणि तिथे मुक्कामासाठी थांबलेल्या लोकांना आपापल्या बजेटनुसार रूम्स उपलब्ध करून देत होते.

रितेश अग्रवाल यांनी ओरॅवलची सुरूवात ६० हजार रुपये जमवून गुडगाव मधील एका हाॅटेल मधुन २०११ मध्ये केली होती.

काही काळ आपल्या स्टार्ट अप व्यवसायावर काम केल्यानंतर रितेश अग्रवाल यांनी त्यांच्या स्टार्ट अप व्यवसायाचे नाव बदलण्याचे ठरवले.रितेश अग्रवाल यांनी आपल्या स्टार्ट अपचे नाव ओरॅवल स्टे वरून ओयो रूम्स असे ठेवले.

यानंतर रितेश अग्रवाल यांनी देशातील अशा सर्व हाॅटेलसोबत भागीदारी करण्यास सुरुवात केली ज्यांची लोकेशन चांगल्या ठिकाणी आहे.अणि ज्यांना आपले हाॅटेल चालवण्यासाठी मदतीची आवश्यकता आहे.

यादवारे ओयोने आपली जबरदस्त ब्रॅडिंग देखील केली.ओयोच्या सर्विसेसमुळे ग्राहक अतिशय खुष होते म्हणून वेळेनुसार इतर हाॅटेल देखील ओयो सोबत जोडले गेले.

जसजसे वेगवेगळ्या ठिकाणची हाॅटेल ओयो रूम्स सोबत जोडली गेली तसतशी ओयो रूम्सची पोहोच लोकल एरिया मधील ग्राहकांपर्यंत देखील जाऊन पोहोचली.

ओयो रूम्स मध्ये आरामदायी रूम्स तर उपलब्ध करून दिले जातात शिवाय ग्राहकांना इतर आवश्यक सेवा सुविधा देखील पुरविण्यात येतात.म्हणून ग्राहकांना याचे अधिक आकर्षण आहे.

ग्राहकांना संतुष्ट करण्यासाठी वापरलेल्या आपल्या उत्तम रणनीतीसाठी लाईट स्पीड व्हेंचर पार्टनर,डीजी कंझ्युमर पार्टनर,सेकोवेया कॅपिटल,ग्रीनो कॅपिटल दवारे त्यांना मिलियन्स डाॅलर्सची फंडिंग देखील प्राप्त झाली.

त्यांच्या ह्या यशासाठी त्यांना स्वबळावर बनलेला दुसरा सर्वात तरूण अब्जावधीश world second youngest self made billionaire म्हणून प्रस्तुत करण्यात आले होते.

यानंतर रितेश अग्रवाल यांनी आपल्या स्टार्ट अप व्यवसायाचा संपूर्ण देशात विस्तार करण्यावर भर दिला.

पण त्यांच्या ह्या प्रवासात अनेकदा रितेश अग्रवाल वेगवेगळ्या वादाच्या भोवऱ्यात सापडले.

रितेश अग्रवाल यांच्यावर फसवणुकीचे अनेक आरोप देखील करण्यात आले.अनेकदा दंड म्हणून मोठी रक्कम देखील मोजावी लागली.

ओयो रूम्सची सुरूवात गुडगावपासुन झाली पण याचा विस्तार रितेश यांनी संपुर्ण देशात ४ हजार हाॅटेलस सोबत १६० शहरात केला.ह्या संख्येत दिवसेंदिवस अधिक वाढ होत आहे.

ओयो रूम्सने प्राप्त केलेल्या ह्या यशाचे मुख्य कारण म्हणजे त्यांनी सर्वसामान्य जनतेची सर्वात मोठी समस्या दुर करण्याचे काम केले आहे.म्हणून लोकांनी केलेल्या फक्त माऊथ पब्लिसिटी मुळे आज ओयो रूम्सने एवढे भरघोस यश प्राप्त केले आहे.

हेच कारण आहे की आज ओयो रूम्सचे नाव देशातील टाॅप हाॅस्पिटॅलिटी कंपनींच्या यादीत घेतले जाते.हा रितेश अग्रवाल यांनी घेतलेल्या कठोर परिश्रमाचा परिणाम आहे.

रितेश अग्रवाल यांचा काॅलेज ड्राॅप आऊट पासुन ७७०० करोडोंची कंपनी ओयोपर्यतचा प्रवास –

अवघ्या तेरा चौदा वर्षाचे असताना रितेश अग्रवाल यांनी सिमकार्ड विकणे सुरू केले.खुप कमी वयात त्यांनी कोडिंग देखील करणे सुरू केले होते.

यानंतर त्यांनी एफ एम सीजी (fast moving consumer goods) विकायला सुरुवात केली.म्हणजे खुप कमी वयात रितेश अग्रवाल यांनी वस्तू बनवणे अणि विकणे शिकून घेतले होते.

जेव्हा रितेश अग्रवाल सातव्या इयत्तेत शिकत होते तेव्हा त्यांची सर्वात मोठी बहिण जी काॅलेज मध्ये शिकत होती ती एका उद्योजकता कार्यक्रमाला गेली होती.

तेव्हा तिने घरात याविषयी चर्चा केली तेव्हा रितेश अग्रवाल यांच्या मनात विचार आला की हा entrepreneur शब्द खूप वेगळा आहे.मला पण हेच बनायचे आहे.

म्हणजे ज्या वयात लहान मुलांना विचारल्यावर ते सांगतात की मला डाॅक्टर किंवा इंजिनिअर बनायचे आहे त्या वयात रितेश अग्रवाल यांनी entrepreneur बनायचे ठरवले.

दहावीचे शिक्षण त्यांनी ओरिसा मधुनच पुर्ण केले.जेव्हा अकरावीला जाण्याची वेळ आली तेव्हा ते जेईई परीक्षा देऊन इंजिनिअरिंग करण्यासाठी भारतातील कोचिंग केंद्र कोटा येथे गेले.

कोटा येथे इंजिनिअरिंगसाठी गेल्यावर रितेश अग्रवाल यांचे डोके एकदम चक्रावले कारण तिथे त्यांना पाहायला मिळत होते की सर्व विद्यार्थी सकाळ संध्याकाळ फक्त वाचनच करत होते.एकमेकांशी बोलत नव्हते, थट्टा मस्करी देखील करत नव्हते.

रितेश अग्रवाल यांना इंजिनिअरींग काॅलेजचे हे वातावरण पाहुन इंजिनिअरींग करण्यात अजिबात रूची राहीली नाही.

मग त्यांनी ठरवले लहानपणापासून आपण जो शब्द ऐकत आलो आहे अणि जे आपण बनायचे आहे ते नेमकी असते काय हे जाणून घेऊया असे त्यांनी ठरवले.

उद्योजक entrepreneur म्हणजे काय असते हे जाणुन घेण्यासाठी दर आठवड्याच्या शेवटी कोटा येथून बसने रितेश अग्रवाल दिल्लीला जाऊ लागले.

दिल्ली येथे त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या उद्योजकता कार्यक्रमाला उपस्थिती देखील लावली.रितेश अग्रवाल लहान असल्याने अनेक ठिकाणी त्यांना फ्री मध्ये देखील प्रवेश प्राप्त होऊन जात असे.

जेव्हा रितेश अग्रवाल उद्योजकता कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी दिल्ली यायचे तेव्हा त्यांना अनेक ठिकाणी निदर्शनास आले की प्रत्येक घरात एक अतिरिक्त रुम असायचा जो घरमालकाला भाडयाने द्यायचा होता.

पण तेथील घरमालकांकडे कुठलेही असे संकेतस्थळ उपलब्ध नव्हते जिथे ते आपल्या भाडयाने द्यायच्या असलेल्या रूमची जाहिरात करू शकतील.

अणि तेव्हा रूम्सची खूप गरज असायची कारण अनेक यात्रेकरू लोक दिल्ली येथे फिरायला येत असे तेव्हा त्यांना मुक्कामासाठी रूमची आवश्यकता भासत असे.

अणि ज्यांच्याघरात अतिरिक्त रुम होते त्यांच्याकडे अतिरिक्त रुम भाडयाने देण्यासाठी उपलब्ध आहे हे प्रवासींना माहीत देखील नसायचे.

इथेच रितेश अग्रवाल यांना एक कल्पणा सुचली त्यांनी विचार केला की ते त्यांचे कोडिंग स्कील वापरून मागणी अणि पुरवठयामधील असलेली ही उणीव भरून काढु शकतात.

याचसाठी रितेश अग्रवाल यांनी ओरॅवल स्टे नावाचे एक स्टार्ट अप सुरू केले.यात व्हिला, सर्विस अपार्टमेंट,बेड, ब्रेकफास्ट इत्यादीची सुची असायची.

रितेश अग्रवाल यांनी स्टार्ट अप तर सुरू केले पण ज्या कामासाठी ते आले होते आय आयटी जेईईचा अभ्यास करायला त्याकडे त्यांचे दुर्लक्ष होत होते.

त्यामुळे त्यांना आय आयटी करता आले नाही पण २०१२ मध्ये बारावी उत्तीर्ण झाले.अणि दिल्लीच्या महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला.

बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर अणि काॅलेज सुरू होण्याच्या तीन चार महिन्याच्या कालावधीत रितेश अग्रवाल हाॅटेल इंडस्ट्रीला अधिकतम प्रमाणात समजुन घेण्यासाठी तसेच बाजारात असलेल्या इतर समस्या जाणून घेण्यासाठी उत्तर भारतात प्रवास करू लागले.फिरू लागले,वेगवेगळ्या ठिकाणांना हाॅटेल्सला भेट देऊ लागले.

जेणेकरून त्यांच्या स्टार्ट अपला कस्टमरशी संबंधित इतर समस्या देखील जाणुन घेऊन योग्यरीत्या दुर करता येतील.

रितेश अग्रवाल प्रत्येक दिवशी एका नवीन हाॅटेल मध्ये रूम घेऊन राहु लागले हे जाणुन घेण्यासाठी की हाॅटेल मध्ये राहत असलेल्या ग्राहकांना नेमकी कोणकोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते.

शंभरपेक्षा अधिक हाॅटेल्समध्ये राहिल्यानंतर रितेश अग्रवाल यांना लक्षात आले की मागणी अणि पुरवठयापेक्षा इतर समस्यांना देखील सामोरे जावे लागत आहे.

रितेश अग्रवाल यांनी सुरू केलेल्या ओरॅवल स्टेची संकल्पना एअर बीएनबीच्या संकल्पणे सारखी होती पण तेव्हा एअरबीएनबी भारतीय बाजारात आले देखील नव्हते.

यानंतर काॅलेज सुरू झाले अणि दोन दिवस रितेश अग्रवाल काॅलेजला गेले पण तिथे त्यांचे अजिबात मन लागत नव्हते.

मग ते काॅलेजला दांडी मारू लागले असे करत करत तब्बल सहा महिने काॅलेजला नाही गेल्यावर नंतर त्यांनी काॅलेज जाणेच सोडुन दिले.

जेव्हा रितेश अग्रवाल यांचे वडील दिल्ली येथे पाहण्यासाठी येतात की रितेश अग्रवाल यांचा अभ्यास कसा सुरू आहे पण जेव्हा काॅलेज मधुन कळते की रितेश अग्रवाल मागील सहा महिन्यांपासून काॅलेजला गेलेच नाहीये तेव्हा त्यांचे डोके चक्कर खाऊ लागते.

मग रितेश अग्रवाल कसेबसे आपल्या वडिलांची समजुन काढतात अणि सांगतात की ते स्वताच्या एका स्टार्ट अप व्यवसायावर सध्या काम करत आहेत.

अणि समजा ह्या स्टार्ट अप व्यवसायात त्यांना यश नाही मिळाले तर पुढच्या वर्षी ते पुन्हा इंजिनिअरींग काॅलेजला प्रवेश घेतील.

अशा पद्धतीने मोठ्या मुश्किलीने रितेश अग्रवाल यांनी आपल्या कुटुंबाला काॅलेज सोडुन स्टार्ट अप व्यवसाय करण्यासाठी राजी केले.

आनंदाची गोष्ट म्हणजे पुढे २०१२ मध्ये व्हेंचर नर्सरीच्या अॅक्सलेटर प्रोग्राम मध्ये त्यांची निवड होते.अॅक्सलेटर प्रोग्राम मध्ये गेल्यावर त्यांना लक्षात आले की स्टार्ट अप व्यवसाय करण्यासाठी त्यांना अंदाजे अनुभव ह्या समस्येवर काम करणे आवश्यक आहे.

रितेश अग्रवाल यांना अनेक हाॅटेल्समध्ये गेल्यावर लक्षात आले की ते ज्या हाॅटेल मध्ये जायचे त्या हाॅटेलची फिक्स किंमत नसायची,कुठे चार हजार तर कुठे आठ हजार पर्यंत देखील हाॅटेल्स राहण्यासाठी उपलब्ध होत होते.

पण कुठल्याही हाॅटेलात सातत्याने चांगला अनुभव तसेच राहण्याचा उत्तम दर्जा सोयी सुविधा ग्राहकांना उपलब्ध नव्हत्या.काही हाॅटेल मध्ये बाथरूम खराब असायचा, एखाद्या हाॅटेल मध्ये रूम चांगला असायचा पण हाॅटेल मध्ये असलेला टिव्ही बिघडलेला असायचा.

काही हाॅटेल मध्ये कुठलाही साईन बोर्ड लावलेला नसल्याने ग्राहकांना तिथे हाॅटेल आहे हे देखील लक्षात येत नव्हते.काही हाॅटेल मध्ये रिसेप्शनिस्टची सुविधा नसायची काही हाॅटेलात ग्राहकांना नाश्ता उपलब्ध नव्हता.

खुप जास्त पैसे देऊन देखील ग्राहकांना छोट्याशा रूममध्ये कुठल्याही चांगल्या सोयी सुविधेविना राहावे लागत होते अणि ह्या समस्येकडे कोणी लक्ष देखील देत नव्हते ही बाब  रितेश अग्रवाल यांच्या लक्षात आली.

म्हणून रितेश अग्रवाल यांनी ही समस्या आपल्या स्टार्ट अप व्यवसायातुन दुर करण्याचे ठरवले.

मग २०१३ मध्ये रितेश अग्रवाल यांनी आपल्या स्टार्ट अप व्यवसायाचे नाव ओरॅवल स्टे बदलुन ओयो रूम्स असे ठेवले.ओयोचा फुलफाॅम on your own असा होता.

रितेश अग्रवाल यांना समस्या समजली होती अणि त्यांना कोणती समस्या दुर करायची आहे हे देखील कळले होते.

पण ही समस्या दूर करण्यासाठी त्यांना हाॅटेलची आवश्यकता होती.

अणि रितेश अग्रवाल तेव्हा फक्त अठरा एकोणीस वर्षाचे होते.त्यांना हाॅटेल कुठून मिळणार ही मुख्य समस्या निर्माण झाली.

पण रितेश अग्रवाल यांनी हा विचार अजिबात केला नाही की मी छोटा आहे मला हाॅटेल कुठुन भेटेल कसा मी माझ्या स्टार्ट अप व्यवसायावर काम करेल.

रितेश अग्रवाल यांनी वेगवेगळ्या हाॅटेलच्या मालकांची भेट घेतली.अणि शेवटी गुडगाव येथील एका हाॅटेल मालकासोबत त्यांनी पार्टनरशिप केली.

कारण त्या हाॅटेल मालकाचे हाॅटेल देखील फारसे चालत नव्हते.हाॅटेल मध्ये पंधरा रूम होते पण फक्त तीन किंवा दोनच रूमची कस्टमरकडुन बुकिंग होत होती.

यात रितेश अग्रवाल यांनी हाॅटेल मालकासोबत ही पार्टनरशिप केली की हाॅटेल मालकाने काही महिने त्याचे हाॅटेल चालवण्यासाठी द्यावे यात जो काही नफा होईल तो दोघांमध्ये फिफ्टी फिफ्टी वाटुन घेऊ.

अणि समजा ह्या पार्टनरशिप दरम्यान हाॅटेलचे काही आर्थिक नुकसान झाले तर त्याची सर्व नुकसानभरपाई रितेश अग्रवाल स्वता करतील.

रितेश अग्रवाल यांना आपल्या स्टार्ट अप आयडीयावर ठामपणे विश्वास होता म्हणून त्यांनी एवढी मोठी रिस्क घेतली.

यानंतर रितेश अग्रवाल यांनी हाॅटेलची व्यवस्थित साफसफाई केली.दिल्ली येथील सदर बाजारात चांगल्या गादया,कर्टन,टेबल इत्यादी हाॅटेल मध्ये लागत असलेल्या मुलभूत वस्तु आणल्या.

रितेश अग्रवाल यांचे मत होते की त्यांना जर ह्या क्षेत्रात प्रवेश करायचा आहे तर त्यांना इंडस्ट्री मध्ये प्रवेश करून ह्या क्षेत्रातील प्रत्येक गोष्टीची खोल माहीती प्राप्त करावी लागेल.

म्हणुन हाॅटेल मधील क्लिनींग हाऊस किपिंग, इत्यादी कामात देखील ते मदत करत.कस्टमरशी देखील संवाद साधत होते.

असे रितेश अग्रवाल यांनी सलग दोन महिने केल्यावर त्या हाॅटेलात जास्तीत जास्त कस्टमर येऊ लागले त्या हाॅटेलची माऊथ पब्लिसिटी देखील होऊ लागली.

अशा पद्धतीने त्या हाॅटेल मध्ये जास्तीत जास्त कस्टमर रूम बुक करण्यासाठी येऊ लागले हे बघुन हाॅटेल मालकाने रितेश अग्रवाल यांचे कौतुक केले त्यांच्या आजुबाजुचे हाॅटेल मालक देखील आपल्या हाॅटेलचे असे रूपांतरण करून घेण्यासाठी रितेश अग्रवाल यांना पार्टनरशिप आॅफर करू लागले.

आजुबाजुच्या हाॅटेल मालकांचा उत्तम प्रतिसाद प्राप्त होत आहेत हे बघुन रितेश अग्रवाल यांना कळुन चुकले की त्याने सुरू केलेल्या स्टार्ट अप व्यवसायात करीअरची खुप मोठी संधी आहे.

मग रितेश अग्रवाल अजुन थोडे रिसर्च करतात त्यात त्यांच्या लक्षात आले की बाजारातील मोठमोठे हाॅटेल जसे की ताज,हिलटन,मॅरीएट,ओबेरॉय हे सर्व लक्झरीअसवर विशेष लक्ष केंद्रित करतात.

अणि यांचे टार्गेट कस्टमर एकदम मोठमोठे हाय क्लास लोक आहेत.हया सर्व हाॅटेल मध्ये शंभर पेक्षा अधिक रूम्स आहेत.येथील चार्जेस जास्त असतात पण हाय क्लास लोकांसाठी चांगला अनुभव इथे प्राप्त होतो.

पण रितेश अग्रवाल यांना रिसर्च मध्ये हे देखील लक्षात आले की यातील ९० टक्के हाॅटेल कडे शंभरपेक्षा कमी रूम उपलब्ध आहेत अणि ते मध्यमवर्गीय ग्राहकांना टार्गेट करतात.

अणि हे हाॅटेल मोठमोठ्या कंपन्या,छोटे मोठे उद्योजक देखील चालवतात.कारण त्यांच्याकडे अतिरिक्त जमीन असल्यामुळे ते पॅसिव इनकम प्राप्त करण्यासाठी हाॅटेल चालवुन पैसे कमवतात.

पण यात देखील जे छोटे हाॅटेल मालक असतात त्यांचे हाॅटेल ब्रॅडेड नसल्यामुळे तसेच ह्या हाॅटेल मालकांना हाॅटेल चालवण्याचा अनुभव देखील नसतो.म्हणुन त्यांना कस्टमरला एक चांगला अनुभव प्रदान करता येत नाही.

ज्यामुळे कस्टमर देखील नेहमी त्रस्त असतात अणि हाॅटेल मालकांना देखील नुकसानाला सामोरे जावे लागत होते.

रितेश अग्रवाल यांना लक्षात येते की ही आपल्या स्टार्ट अप द्वारे लोकांची समस्या दुर करण्याची खूप मोठी सुवर्णसंधी आहे.

याचदरम्यान रितेश अग्रवाल यांना टीएल फेलोशीप प्राप्त झाले ते एशियाचे पहिले व्यक्ती होते ज्यांना टीएल फेलोशीप प्राप्त झाली होती.

रितेश अग्रवाल यांनी टीएल फेलोशीप प्राप्त केली तेव्हा ओमोच्या अंतर्गत तीन हाॅटेल होते.तिघे हाॅटेल चांगले सुरू होते त्यातुन चांगली कमाई देखील होत होती.

पण टीएल फेलोशीप मध्ये त्यांना हे समजले की आपण मोठे ध्येय ठेवणे आवश्यक आहे.जर आपण असेच एक एक हाॅटेल ओयोसोबत जोडले तर हा एक लाईफस्टाईल व्यवसाय बनुन जाईल.

त्यांना चांगले आयुष्य जगता येईल भरपूर पैसे देखील कमावता येतील पण स्वताच्या व्यवसायाला जगभरात पसरवून संपूर्ण जगात एक परिवर्तन घडवून आणता येणार नाही.

म्हणून टीएल फेलोशीप मध्ये त्यांनी मोठा विचार कसा करायचा? मोठे यश प्राप्त करण्यासाठी इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट बनवणे का आवश्यक आहे? व्यवसाय जोरात चालू लागल्यावर प्रोसेसिंग सिस्टम सेट अप करणे का आवश्यक आहे?इत्यादी गोष्टी शिकायला मिळाल्या.

टीएल फेलोशीप पुर्ण झाल्यावर रितेश अग्रवाल यांना आपल्या स्टार्ट अप वर काम करण्यासाठी टीमची आवश्यकता भासु लागली.

मग चांगली टीम बनवण्यासाठी रितेश अग्रवाल लोकांना भेटु लागले त्यांच्याशी संवाद साधु लागले.लिंकड इन सारख्या सोशल साईटवर पोस्ट करू लागले.पण तरी देखील त्यांना पाहीजे तसे टीम मेंबर प्राप्त होत नव्हते.

शेवटी त्यांची भेट अभिनव सिन्हा यांच्याशी झाली ते हाॅवर्ड बिझनेस स्कुल मधुन उत्तीर्ण झाले होते.बिसीजी मध्ये देखील त्यांनी काम केले होते.म्हणुन चांगल्या वेतनश्रेणी सह चांगले जीवन ते जगत होते.

पण अभिनव सिन्हा यांना देखील आपल्या शिक्षणाचा वापर करून समाजात एक परिवर्तन घडवून आणायचे होते.म्हणुन रितेश अग्रवाल यांच्याशी भेट झाल्यावर त्यांचे मोठे ध्येय लक्षात आल्यावर त्यांनी रितेश अग्रवाल यांच्यासोबत काम करायचे ठरवले.

मग दोघांनी आपापल्या जबाबदारी वाटुन घेतल्या ज्यात अभिनव सिन्हा यांची जबाबदारी हाॅटेल मधील रुमला व्यवस्थित ठेवणे,सर्व प्रक्रियेचे प्रमाणीकरण करणे ही होती.

अणि रितेश अग्रवाल याची जबाबदारी होती ओयो रूम्सचा उत्तम ब्रॅड बनवणे,अणि विक्रीवर लक्ष केंद्रित करणे होती.

जेणेकरून जास्तीत जास्त हाॅटेल त्यांच्याशी जोडले जातील.

याचवेळी रितेश अग्रवाल यांची भेट अनुज यांच्याशी झाली त्यांचे ध्येय ओयोसाठी सप्लाय पुर्णपणे बिल्ड करणे होते.असे तिघे जणांची टीम मिळून यांनी काम करण्यास सुरुवात केली.

सुरूवातीला ओयोसोबत फक्त तीन हाॅटेल जोडलेले होते पण एका वर्षात ह्या तिघांनी मिळून काम केल्यानंतर ओयोसोबत पन्नास पेक्षा अधिक हाॅटेल जोडले गेले.यानंतर टीममध्ये अजुन वाढ झाली.

रितेश अग्रवाल अणि त्याचे टीम मेंबर यांना माहीत होते की आपल्याला आपल्या ह्या स्टार्ट अप व्यवसायाला पुढच्या उत्तम पातळीवर घेऊन जायचे असेल तर आपल्याला अजुन चांगल्या टीमची आवश्यकता आहे.

मग रितेश अग्रवाल यांनी आपल्या सर्व टीम मेंबरला सांगितले की त्यांनी आपल्या करीअर मध्ये ज्या उत्तम १० २० लोकांसोबत केले आहे त्यांनी त्यांचे नाव सुचवावे त्यातून आपण टीम मेंबरची निवड करू शकतो.

इथून त्यांना चांगला रिफरन्स झाला अणि मग पाच सहा मेंबर वरून त्यांनी त्यांची पन्नास जणांची टीम तयार केली.

कालांतराने ओयोला बघुन मग भारतात इतर स्टार्ट अप देखील ह्या क्षेत्रात येऊ लागले ते देखील ओयो जे करत होते तेच करू लागले.मग ओयोच्या लक्षात आले की आपल्याला बाजारात जिंकायचे असेल तर अजुन वेगाने धाव घ्यावी लागेल.

म्हणून एकेदिवशी रितेश अग्रवाल यांनी आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना आॅफिस मध्ये बोलावले.अणि त्यांना विचारले की आपण एका महिन्यात दिल्ली मधील किती हाॅटेल आपल्या प्लॅटफॉर्मवर आॅनबोर्ड करतो त्यावर कर्मचारी ३० ते ३५ हाॅटेल सांगतात.

मग रितेश अग्रवाल त्यांना सांगतात की पुढच्या महिन्यात आपल्याला १०० हाॅटेल आॅनबोर्ड करायचे आहेत.यासाठी रितेश अग्रवाल एक योजना आखतात.

ते दिल्लीला सात क्लस्टर मध्ये विभाजित करतात.अणि प्रत्येक क्लस्टर करीता वेगवगळी टीम बनवली.यात त्यांनी टीमला सांगितले पहिल्या दिवशी सर्व हाॅटेल मध्ये जाऊन कागदपत्रांवर सह्या करून घ्या.

दुसरया दिवशी जाऊन सर्व आॅडिट करून घ्यायचे की आपल्याला काय हवे आहे अणि काय नको आहे.तिसरया दिवशी निर्धारित एरियातील सर्व हाॅटेल स्टॅनडरडाईज करायचे.अणि चौथ्या दिवशी हाॅटेल लाईव्ह करायचे अशी रणनीती रितेश अग्रवाल यांनी बाजारातील प्रतिस्पर्धींना मात देऊन पुढे जाण्यासाठी तयार केली.

यानंतर ह्या प्लॅनवर अंमलबजावणी केल्यावर ओयोने पुढील महिन्यात तब्बल १३० हाॅटेलला आपल्यासोबत जोडण्यात यश प्राप्त केले.

हीच स्ट्रॅटेजी संपूर्ण भारतात अंमलात आणुन रितेश अग्रवाल यांनी अणि त्यांनी चार हजार हाॅटेल आपल्यासोबत जोडण्यात यश प्राप्त केले.

२०१६ मध्ये ओयो भारतातील सर्वात मोठी हाॅटेल साखळी बनले होते.

यानंतर त्यांनी भारतात स्थित असलेली जगातील सर्वात मोठी हाॅटेल साखळी बनण्यासाठी पाऊल उचलायला सुरुवात केली.

यानंतर ओयोने साऊथ ईस्ट,एशिया तसेच चायना वर लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली.चीन हे भारतापेक्षा मोठे मार्केट असल्याने तसेच त्यांची संस्कृती अर्थव्यवस्था वेगळी असल्याने त्यांना क्रॅक करणे सोपे नव्हते.

याकरिता ओयोने चायना मध्ये लोकल टीम हायर केली.तेथील लोकल लीडर्सला प्रमोट केले.अणि मग हळुहळू ओयो चायना मध्ये देखील मोठ्या प्रमाणावर प्रगती करू लागले.

आज ओयो इंडिया मध्ये जेवढी मोठी कंपनी आहे तेवढी चायना मध्ये देखील बनलेली आहे.याचसोबत ओयोने नेपाळ, मलेशिया, थायलंड, इंडोनेशिया मध्ये देखील आपल्या व्यवसायाचा विस्तार केला.

मग ओयोने युरोप मध्ये युके वर वर्चस्व प्रस्थापित केले.मग त्यांनी पुर्ण यूरोप मधील मार्केट मध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित केले.

ओयो सध्या ८० देशांतील ८०० पेक्षा अधिक शहरात पोहोचलेले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top